Onion Rate : कांदा हे एक प्रमुख नगदी पीक (Cash Crop) असून राज्यातील शेतकरी बांधवांचे (Farmer) सर्व अर्थकारण या नगदी पिकावर अवलंबून असते. गेल्या काही दिवसांपासून कांदा या पिकाला अतिशय कवडीमोल बाजार भाव (Onion Market Price) मिळत आहे यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधव अक्षरश मेटाकुटीला आला असल्याचे चित्र आहे. कांदा (Onion Crop) हे नेहमीच बेभरवशाचे पीक म्हणून ओळखले जाते.
खानदेशात कांद्याच्या पिकावर कोंबडीचा देखील व्यवहार करू नये अशी म्हण खूपच प्रचलनात आहे. कदाचित कांदा बाजार भावाचा लहरीपणा याला कारणीभूत असेल. मित्रांनो सध्या कांद्याला बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सर्वसाधारण बाजारभाव राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Apmc) मिळत आहे. अशा परिस्थितीत कांदा पिकासाठी झालेला खर्च काढणे देखील मुश्किल असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी नमूद करत आहेत.
दरम्यान कांदा उत्पादक शेतकरी बांधवांची (Onion Grower Farmer) दिवाळी गोड होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात कांद्याच्या दरात तेजी बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कांद्याला चांगला ऐतिहासिक बाजार भाव (Onion Bajarbhav) मिळणार असल्याचे तज्ञ नमूद करत आहेत. अशा परिस्थितीत कांदा भाव वाढीची कारणे काय राहणार आहेत तसेच याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो कमी बाजार भाव असताना व्यापारी कांद्याची साठवणूक करतात. आणि जेव्हा बाजारात कांदा तेजी मध्ये विकला जातो तेव्हा कांदा व्यापारी साठवलेला कांदा विक्रीसाठी काढतात. त्यामुळे कांदा दर तेजीत असो की मंदित व्यापाऱ्यांची कायमच चांदी होतं असते. आता ऑक्टोबर मध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कांद्याच्या दरात सुधारणा होणार असल्याचे जाणकार नमूद करत आहेत मात्र याचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना अधिक होणार असल्याचे देखील तज्ञांकडून बोलले जात आहे.
कांदा दरवाढीची कारणे नेमकी कोणती
मित्रांनो खरं पाहता, राज्यातील कांद्याची खरीप पूर्व लागवड अतिवृष्टीच्या पावसामुळे बाधित झाली आहे. यामुळे खरीप पूर्व लागवडमधला कांदा उत्पादनात मोठी घट झाली आहे. यामुळे डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत बाजारपेठेत कांद्याची आवक लक्षणीय कमी होणार आहे. सध्या बाजारपेठेत कांद्याची आवक कमी असून कांद्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत मागणीप्रमाणे पुरवठा नसल्याने कांद्याचे बाजारभाव कडकणार असल्याचे जाणकार नमूद करत आहे. यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कांद्याला चांगला बाजारभाव मिळणार आहे.
मित्रांनो राज्यात रब्बी कांद्याची लागवड ही सप्टेंबर महिन्यात सुरू होते हा कांदा बाजारात जवळपास जानेवारी महिन्याच्या आसपास येतो. मात्र राज्यातील अनेक भागात अजूनही पाऊस सुरू असल्याने तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात अतिवृष्टी सारखा पाऊस झाला असल्याने कांद्याची रोपवाटिका बाधीत झाली आहे. यामुळे कांदा लागवडीस विलंब होत आहे. अशा परिस्थितीत जानेवारीत येऊ पाहणारा हा कांदा उशिरा बाजारात येणार असल्याचे जाणकार नमूद करत आहेत. याशिवाय प्रमुख कांदा उत्पादक राज्य म्हणून ओळखले जाणारे कर्नाटक मध्ये देखील कांद्याच्या उत्पादनात घट होणार आहे.
कर्नाटक मध्ये मुसळधार पाऊस झाला असल्याने कांद्याचे पीक क्षतिग्रस्त झाले आहे. अशा परिस्थितीत देशांतर्गत महाराष्ट्राच्या कांद्याची मागणी वाढणार असून महाराष्ट्राच्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. कर्नाटकमध्ये झालेल्या कांदा पिकाचे नुकसान देखील ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कांद्याचे दर तेजीत ठेवणार आहे. मात्र असे असले तरी, राज्यात हवामान बदलामुळे कांदा पिकासाठी आवश्यक उत्पादन खर्च मोठा वाढला आहे, शिवाय उत्पादनातं देखील घट होणार आहे. अशा परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना वाढलेल्या बाजार भावाचा पाहिजे तेवढा फायदा होणार नसून व्यापाऱ्यांना मात्र भरघोस नफा मिळणार आहे.
किती वाढणार बाजारभाव
मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कांद्याला चार हजार रुपये ते 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा उच्चांकी बाजार भाव मिळणार आहे. जाणकार लोकांच्या मते दसरा आणि दिवाळी या सणांमध्ये कांद्याला मोठी मागणी असते. संपूर्ण देशभराचा विचार केला तर कांदा उत्पादनात मोठी घट घडून आली आहे. अशा परिस्थितीत देशांतर्गत कांद्याची मागणी वाढणार असून कांद्याला बाजार भाव देखील चांगला मिळणार आहे.