Onion Rate : कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. मित्रांनो आता कांद्याच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 1500 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास सर्वसाधारण बाजारभाव मिळत आहे. निश्चितच सध्या मिळत असलेला बाजार भाव हा कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी पुरेसा नसून यामध्ये वाढ होण्याची गरज आहे.
मात्र असे असले तरी कांद्याच्या दरात आता सुधारणा होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव स्पष्टपणे पहायला मिळत आहेत. मित्रांनो त्यासाठी आपणास ठाऊकच आहे आपण रोजच कांद्याच्या बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण आज दसऱ्याच्या दिवशी कांद्याला मिळालेल्या बाजार भावाविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- मित्रांनो आज नागपूर एपीएमसीमध्ये 840 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला किमान बाजार भाव एक हजार रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाला असून कमाल बाजार भाव 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव एक हजार 325 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- मित्रांनो पुणे एपीएमसीमध्ये आज सहा हजार 889 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात एपीएमसीमध्ये कांद्याला सातशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच एपीएमसीमध्ये कांद्याला 1250 रुपये प्रतिक्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
पुणे पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 15 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज या एपीएमसीमध्ये कांद्याला 1200 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आज नंबर एक कांद्याची 1 हजार 619 क्विंटल आवक झाली होती. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 1600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून दोन हजार अकरा रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1805 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज नंबर 2 कांद्याची 941 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 1200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून एक हजार 600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार 1400 रुपये नमूद करण्यात आला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- एपीएमसीमध्ये आज एक हजार क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1350 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती :- एपीएमसीमध्ये आज 1800 कुंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली आज झालेल्या लिलावाच्या एपीएमसीमध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून एक हजार 520 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1250 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती :- एपीएमसीमध्ये आज 13240 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 375 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2 हजार 200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव एक हजार 550 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.