Onion Rate : गेल्या आठवडाभरापासून कांदा दरात रोजाना थोडी-थोडी वाढ होत आहे. आठवडाभरापूर्वी कांद्याला मात्र एक हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा कमी दर मिळतं होता. या ठिकाणी सरासरी तर 500 ते 600 रुपये इतका खाली आला होता. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत होती.
दरम्यान आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळतं आहे. कांदा दरात वाढ झाली असून सरासरी बाजार भावाने 1500 प्रतिक्विंटलचा पल्ला ओलांडला असून काही ठिकाणी एक हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा सरासरी दर कांद्याला मिळू लागला आहे.
मात्र काही ठिकाणी अजूनही कांदा दबावातच आहेत. आज झालेल्या लिलावात सातारा एपीएमसीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला तर आज खानदेश मधील भुसावळ एपीएमसीमध्ये नवीन कांद्याला मात्र एक हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला.
निश्चितच कांदा दरामधील ही तफावत शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम तयार करत आहे. अशातच आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या कांदा लिलावाची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 195 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1800 रुपये प्रति क्विंटल एवढा नमुद करण्यात आला आहे.
भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 81 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर देखील 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा नमुद करण्यात आला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 14280 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा नमुद करण्यात आला आहे.