Onion Rate : कांदा (Onion Crop) हे राज्यात उत्पादित केल जाणार एक मुख्य नगदी पीक (Cash Crop) आहे. या पिकाची आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खांदेश नव्हे-नव्हे तर कोकणात देखील कांद्याची लागवड पाहायला मिळते. अशा परिस्थितीत राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे सर्व अर्थकारण कांदा या नगदी पिकावर अवलंबून असते.
यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे (Onion Grower Farmer) नेहमीच कांद्याच्या बाजार भावाकडे बारीक लक्ष लागून असते. आता कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. मित्रांनो गेल्या दोन दिवसांपासून कांद्याच्या दरात (Onion Bazar Bhav) सुधारणा होत असल्याचे चित्र आहे. मात्र असे असले तरी राज्यातील तुरळकच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला समाधानकारक बाजारभाव (Onion Market Price) मिळत आहे.
आज रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 2400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. मात्र या बाजार समितीत कांद्याची मात्र दहा क्विंटल आवक झाली होती. यामुळे कांद्याच्या दराबाबत अजूनही शेतकरी बांधव संभ्रमावस्थेत आहेत.
दरम्यान जाणकार लोकांनी बाजार समितीत आवक खूपच कमी असल्याने हा दर मिळाला असल्याची माहिती दिली आहे. मित्रांनो आपण रोजच कांद्याचे बाजार भाव जाणून घेत असतो. अशा परिस्थितीत आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मिळालेल्या बाजारभावाविषयी चर्चा करणार आहोत.
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :- राहता एपीएमसीमध्ये आज सहा हजार 350 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2 हजार 200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव एक हजार 750 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- पुणे एपीएमसी मध्ये आज 13252 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1700 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 1150 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.
पुणे खडकी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 32 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला सातशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1 हजार 400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच एपीएमसीमध्ये आज कांद्याला 1050 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
पुणे पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समिती:- या एपीएमसीमध्ये आज बारा क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज या एपीएमसीमध्ये कांद्याला एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 382 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच एखाद्या एपीएमसीमध्ये कांद्याला 950 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- पारनेर एपीएमसीमध्ये आज 4975 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच या एपीएमसीमध्ये आज कांद्याला 1250 रुपये प्रतिक्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
रामटेक कृषी उत्पन्न बाजार समिती :- रामटेक एपीएमसीमध्ये आज दहा क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2 हजार 400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 2200 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.