Onion Rate : कालपासून अर्थातच वसुबारस पासून देशात दीपोत्सवाच्या सणाला सुरुवात झाली आहे. दरम्यान आज दीपोत्सवाचा दुसरा दिवस अर्थातच धनत्रयोदशीचा दिवसं. आज राज्यातील काही निवडक बाजारांमध्ये कांद्याचे लिलाव झालेत. यातील काही बाजारांमध्ये कांद्याला फारच चांगला भाव मिळाला आहे.
खरे तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कांदा मार्केटचा ट्रेंड हा वाढीच्या दिशेने आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी कांद्याच्या किमती फारच दबावात होत्या. मात्र निवडणुका झाल्यात तेव्हापासून कांद्याच्या किमती वाढलेल्या आहेत.
निवडणुकीच्या आधी कांद्याला अपेक्षित असा दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येत नव्हता. परंतु लोकसभा निवडणुकीनंतर बाजाराचे चित्र बदलले आहे आता कांद्याला चांगला समाधानकारक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय.
दरम्यान आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला सर्वाधिक दर मिळाला असल्याची नोंद महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज धनत्रयोदशीच्या दिवशी 3250 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान दोन हजार रुपये कमाल 5745 रुपये आणि सरासरी 4651 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
तसेच आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला सर्वाधिक दर मिळाला असल्याची नोंद करण्यात आली आहे. सोलापूर एपीएमसी मध्ये आज 76,138 क्विंटल लाल कांदा आवक झाली. आजच्या लिलावात सोलापूर एपीएमसी मध्ये लाल कांद्याला किमान 200 कमाल 5800 रुपये आणि सरासरी 1600 रुपये असा भाव मिळाला आहे.
एकंदरीत धनत्रयोदशीच्या दिवशी सोलापूर आणि कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनुक्रमे लाल आणि उन्हाळी कांद्याला विक्रमी दर मिळाला असून यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
तथापि सोलापूर एपीएमसी मध्ये मिळणारा सरासरी बाजार भाव हा गत काही दिवसांच्या तुलनेत कमी झाला असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आगामी काळात बाजार भाव आणखी घसरणार की काय अशी भीती आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागली आहे.