Onion Rate : केंद्रातील सरकारने निवडणुकीच्या धामधुमीत कांदा निर्यात बंदी मागे घेण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे कांदा बाजार भावात सुधारणा होणार असे म्हटले गेले होते. खरे तर केंद्रातील सरकारने डिसेंबर 2023 मध्ये कांदा निर्यात बंदी लागू केली. कांदा निर्यात बंदीमुळे देशांतर्गत कांद्याचा स्टॉक वाढला आणि यामुळे बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. परिणामी देशभरातील शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात तीव्र नाराजी पाहायला मिळाली.
ऐन निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात रोष वाढत होता आणि सरकारने हाच रोष कमी करण्यासाठी कांदा निर्यात बंदी मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतला. खरे तर शेतकऱ्यांनी आणि व्यापारी वर्गाने कांदा निर्यात पुन्हा सुरू झाली पाहिजे अशी मागणी लावून धरली होती.
विरोधी नेत्यांनी देखील सरकारला या मुद्द्यावरून चांगलेच घेरले होते. यामुळे सरकारला कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा लागला. यानुसार आता कांदा निर्यात सुरू झाली आहे. मात्र कांदा निर्यात सुरू केली असली तरी देखील कांदा निर्यात करताना काही अटी आणि शर्ती लावून देण्यात आल्या आहेत.
यामुळे कांदा निर्यात सुरू झाल्यानंतरही कांद्याचे बाजार भाव वाढत नसल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळत आहे. कांदा निर्यात सुरू करण्याचा निर्णय झाला आणि त्या दिवशी राज्यातील अनेक बाजारांमध्ये कांदा बाजारभावात सुधारणा झाली. मात्र तदनंतर पुन्हा एकदा कांदा दरात घसरण पाहायला मिळाली.
त्यामुळे कांदा निर्यात बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला पण निर्यात शुल्क लावून अप्रत्यक्षरीत्या कांदा निर्यात बंदी सुरूच ठेवली असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. अशातच मात्र कांदा उत्पादकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे आज राज्यातील काही बाजारांमध्ये कांदा बाजार भावाने 2500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा टप्पा गाठला आहे. आज राज्यातील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक भाव मिळाला आहे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक भाव
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 100, कमाल 2500 आणि सरासरी 1300 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला आहे.
जुन्नर आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 1 हजार, कमाल 2310 आणि सरासरी 1600 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
कराड कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 1400, कमाल 2200 आणि सरासरी 2200 मिळाला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 700 कमाल 2301 रुपये आणि सरासरी 1700 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 700, कमाल 2200 आणि सरासरी 1400 रुपये असा भाव मिळाला आहे.