Onion Rate On 15 August : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लोकसभा निवडणुकीनंतर सुगीचे दिवस आले आहेत. कारण म्हणजे कांदा बाजार भावात मोठी सुधारणा झाली आहे. निवडणुकीआधी कांद्याला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नव्हता. यामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्चही भरून काढता आला नाही.
निवडणुकीआधी कांदा निर्यात बंद होती. याचा फटका शेतकऱ्यांना बसत होता. निवडणुकीच्या गडबडीत सरकारने निर्यात सुरू केली. मात्र निर्यातीसाठी काही जाचक अटी देखील लावून देण्यात आल्यात. यामुळे निर्यात सुरू होऊनहीं शेतकऱ्यांना याचा फायदा मिळाला नाही.
परंतु बकरी ईदपासून मार्केटमध्ये कांद्याचा तुडवडा तयार झाला असून मागणी वाढली आहे. याचा परिणाम हा बाजारभावावर दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर चांगलेच कडाडले असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत या चालू आठवड्यात कांद्याच्या दरात तब्बल सातशे रुपयांपर्यंतची वाढ नमूद करण्यात आली आहे.
दरम्यान आज 15 ऑगस्टला राज्यातील काही मोजक्याच बाजारांमध्ये कांद्याचे लिलाव झालेत. अशा परिस्थितीत आज आपण 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर राज्यातील कोणत्या बाजारांमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कोणत्या बाजारात मिळाला कांद्याला सर्वाधिक भाव
शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज एक नंबर कांद्याला किमान 3000, कमाल 3700 आणि सरासरी 3350 असा भाव मिळाला. या मार्केटमध्ये आज दोन नंबर कांद्याला किमान 2200, कमाल 2800 आणि सरासरी 2550 असा भाव मिळाला. तसेच तीन नंबर कांद्याला या मार्केटमध्ये आज किमान 1000, कमाल 2000 आणि सरासरी 1650 असा भाव मिळाला आहे.
पुणे पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 3500, कमाल 3700 आणि सरासरी 3600 असा भाव मिळाला आहे.
जुन्नर नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 1100, कमाल 3700 आणि सरासरी 3000 असा भाव मिळाला आहे.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 500, कमाल 3500 आणि सरासरी 3000 असा भाव मिळाला आहे.
भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती : खानदेशातील या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 3000, कमाल 3200 आणि सरासरी तीन हजार दोनशे असा भाव मिळाला आहे.