Onion Rate News : केंद्र सरकारने नुकत्याच तीन दिवसांपूर्वी अर्थातच पाच एप्रिल ला एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयानुसार केंद्र शासनाने मालदीवला काही जीवनावश्यक वस्तूंची निर्यात करण्यास परवानगी दिलेली आहे. यामध्ये कांद्याच्या निर्यातीला देखत परवानगी देण्याचा मोठा निर्णय केंद्रातील सरकारने घेतलेला आहे.
यानुसार मालदीवला 35 हजार 749 कांदा निर्यात केला जाणार आहे. यामुळे कांदा बाजार भावात थोडीशी सुधारणा होईल अशी आशा व्यक्त होत होती. या निर्यातीचा फारसा फायदा होणार नाही, मात्र दराला थोडासा आधार मिळणार असे म्हटले जात होते.
यानुसार आता बाजारात कांदा बाजार भावात थोडीशी सुधारणा पाहायला मिळाले आहे. यामुळे अडचणीच्या काळात कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार काल अर्थातच रविवारी राज्यातील काही बाजारांमध्ये कांदा दरात सुधारणा झालेली आहे. काल रविवार असल्याने काही निवडक बाजारांमध्येच कांद्याचे लिलाव झालेत.
कालच्या लिलावात राज्यातील बाजारांमध्ये जवळपास 43 हजार 830 क्विंटल कांद्याची आवक झाली असल्याची माहिती पणनच्या अधिकृत संकेतस्थळावरून मिळाली आहे. यात सर्वाधिक लोकल कांद्याची आवक झाली आहे.
काल, राज्यातील बाजारांमध्ये कांद्याला नऊशे रुपये प्रति क्विंटल पासून ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा सरासरी भाव मिळाला आहे. दरम्यान आता आपण राज्यातील कोणत्या बाजारात कांद्याला विक्रमी भाव मिळाला आहे ? हे जाणून घेणार आहोत.
कुठे मिळाला विक्रमी भाव?
जुन्नर आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये काल 7376 क्विंटल चिंचवड कांद्याची आवक झाली. यात किमान एक हजार रुपये प्रतिक्विंटल, कमाल 1810 प्रतिक्विंटल आणि सरासरी 1500 प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
रामटेक कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 1400, कमाल सोळाशे आणि सरासरी 1500 रुपये भाव मिळाला आहे.
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 200, कमाल 1800 आणि सरासरी 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
पुणे खडकी कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 1000, कमाल 1700 आणि सरासरी 1350 असा भाव मिळाला आहे.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 300, कमाल 1700 आणि सरासरी 1300 असा भाव मिळाला आहे.