Onion Rate Maharashtra : सध्या कांद्याचा बाजार तेजीत आला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आज देखील राज्यात कांद्याला चांगला विक्रमी भाव मिळाला आहे. खरतर फेब्रुवारी ते जून कालावधीत कांद्याला मात्र दोनशे ते तीनशे रुपये प्रति क्विंटल असा सरासरी दर मिळत होता.
काही बाजारात 400 ते 500 रुपये असा भाव मिळत होता मात्र, खूपच मोजक्या मालाला हा दर मिळायचा. शिवाय चार ते पाच रुपये प्रति किलोचा भाव पिकासाठी आलेला उत्पादन खर्च तर सोडाच पण वाहतुकीचा खर्च काढण्यासाठी देखील पुरेसा नव्हता. साहजिकच यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले होते.
यामुळे कांद्याने अनेक शेतकऱ्यांना कर्जबाजारी केले आहे. मात्र आता गेल्या महिन्यापासून म्हणजे जुलै महिन्यापासून कांदा दरात तेजी आली आहे. याचा परिणाम म्हणून सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीचे समाधान पाहायला मिळत आहे.
पण तरीही गेली पाच ते सहा महिने अगदी कवडीमोल दरात कांदा विकला असल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई यातून होणे अशक्य असल्याचे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. मात्र असे असले तरी दरात झालेली ही सुधारणा शेतकऱ्यांना हातभार लावणार असं शेतकऱ्यांकडून सांगितलं जात आहे.
दरम्यान आज राज्यात कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल बाजार भाव मिळाला आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील कोणत्या बाजारात कांद्याला विक्रमी दर मिळाला आहे याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या बाजारात मिळाला कांद्याला विक्रमीं दर?
चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज 144 क्विंटल कांदा आवक झाली. आजच्या लिलावात या बाजारात 1400 रुपये प्रति क्विंटल किमान, तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला आहे.
पेन कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज 276 क्विंटल कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला कीमान 2600, कमाल 2800 आणि सरासरी 2600 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे.
अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट : या मार्केटमध्ये आज 309 क्विंटल कांदा आवक झाली. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 800, कमाल 2400 आणि सरासरी 1600 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या एपीएमसी मध्ये आज 820 क्विंटल कांदा आवक झाली. यात दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 2400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि 2300 रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी भाव नमूद करण्यात आला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज 26400 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली असून कांद्याला 350 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 2351 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि 1350 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला आहे.
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज 10184 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली असून कांद्याला 450 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 2250 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि 1700 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला आहे.