Onion Rate Maharashtra : कांदा हे एक प्रमुख नगदी पीक आहे. मात्र या नगदी पिकाने शेतकऱ्यांना यंदा चांगलच रडवल आहे. जानेवारी महिन्याच्या अखेर पासून ते जून महिन्यापर्यंत यंदा कांद्याचा बाजार खूपच मंदीत होता. बाजारातील ही मंदी शेतकऱ्यांसाठी खूपच घातक ठरली. या मंदीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.
विशेषता फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कांद्याला खूपच कमी दर मिळत होता. त्यावेळी कांदा मात्र दोन ते तीन रुपये प्रति किलो अर्थातच 200 ते 300 रुपये प्रति क्विंटल दरम्यान विकला जात होता. यामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला उत्पादन खर्च देखील भरून काढता आला नाही. मात्र आता गेल्या जुलै महिन्यापासून बाजारातील मंदी दूर झाली आहे.
बाजारात आता कांद्याला चांगला समाधानकारक भाव मिळत आहे. कांद्याला जवळपास 1000 रुपये प्रति क्विंटल ते 1800 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी भाव मिळू लागला आहे. काही बाजारात दोन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी दर नमूद केला जात आहे. मात्र, दोन हजार रुपयाचा सरासरी भाव राज्यातील खूपच मोजक्या बाजार समितीमध्ये नमूद करण्यात आला आहे.
दरम्यान आज राज्यातील अनेक बाजारात कांद्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. यामुळे कांदा बाजार पुन्हा मंदीत जाणार की काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दरम्यान कांदा बाजारातील लहरीपणा पाहता याबाबत आताच स्पष्टपणे सांगता येणार नाही. दरम्यान आज राज्यातील प्रमुख बाजारात कांद्याला काय भाव मिळाला आहे याबाबत आता आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कांद्याचे आजचे बाजार भाव
कोल्हापूर एपीएमसी : या मार्केटमध्ये आज कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला आहे.
मुंबई कांदा बटाटा मार्केट : या बाजारात आज कांद्याला 1800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि 1450 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला आहे.
खेड चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांदा पंधराशे रुपये प्रति क्विंटल एवढ्या कमाल भावात आणि 1100 रुपये प्रति क्विंटल एवढ्या सरासरी भावात विकला गेला आहे.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांदा 1365 रुपये प्रति क्विंटल एवढ्या कमाल आणि 850 रुपये प्रति क्विंटल एवढ्या सरासरी दरात विकला गेला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांदा 1600 रुपये प्रति क्विंटल एवढ्या कमाल आणि पंधराशे रुपये प्रति क्विंटल एवढ्या सरासरी भावात विकला गेला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांदा 1700 रुपये प्रति क्विंटल एवढ्या कमाल आणि बाराशे रुपये प्रति क्विंटल एवढ्या सरासरी दरात विकला गेला आहे.
या बाजारात मिळाला सर्वोच्च भाव
आज राज्यातील अनेक बाजारात कांद्याच्या कमाल आणि सरासरी बाजारभावात घसरण पाहायला मिळाली. मात्र पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याला 2275 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल आणि पंधराशे रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला आहे. पिंपळगाव बसवंतचा बाजार वगळता आज राज्यातील बहुतांशी बाजारात कांदा दरात घसरण झाली आहे. यामुळे भविष्यात कांदा बाजारात मंदी येणार की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.