Onion Rate Maharashtra : आज महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील अमरावतीच्या बाजारात कांद्याला सर्वाधिक सहा हजार रुपयांचा भाव मिळाला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये कांद्याचे बाजार भाव 6000 च्या पुढे जाणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. खरे तर, लोकसभा निवडणुकीनंतर कांदा बाजार भावात सुधारणा झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे निवडणुकीनंतर बाजार भाव टिकून आहेत.
बाजार भाव निवडणुकीच्या आधी खूपच दबावात होते मात्र नंतर सरकारने निर्यात सुरू केली, पुढे निर्यातीवरील निर्बंध शिथिल केलेत आणि यामुळे आता बाजार भावात चांगली वाढ झाली आहे. दरम्यान, आता आपण राज्यातील प्रमुख बाजारांमधील आजचे कांदा बाजार भाव थोडक्यात जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारांमधील कांदा बाजार भाव
अमरावती फळे आणि भाजीपाला मार्केट : या मार्केटमध्ये कांद्याला कमाल 6000, किमान 3000 आणि सरासरी 4500 असा दर मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 2500, कमाल 5890 अन सरासरी 4825 रुपये असा दर मिळाला आहे.
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 2200, कमाल 5,330 आणि सरासरी 4750 असा भाव मिळाला आहे.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 1500, कमाल 5000 आणि सरासरी 4000 असा दर मिळाला आहे.
देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 1500, कमाल 5000 आणि सरासरी 4750 असा भाव मिळाला आहे.
लासलगाव विंचुर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 2500, कमाल पाच हजार एक अन सरासरी 4,650 असा भाव मिळाला आहे.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 1500, कमाल 5,100 आणि सरासरी 3300 असा भाव मिळाला आहे.
खेड चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 3000, कमाल 5000 आणि सरासरी 4000 असा भाव मिळाला आहे.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 2000, कमाल 5000 आणि सरासरी 3800 असा भाव मिळाला आहे.
पुणे पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 4000, कमाल 5000 आणि सरासरी 4500 असा दर मिळाला आहे.