Onion Rate Maharashtra : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कांदा निर्यात बंदी मागे घेण्याच्या केंद्राच्या निर्णयानंतर आता कांदा बाजार भावात सुधारणा होऊ लागली आहे. खरे तर केंद्रातील मोदी सरकारने डिसेंबर 2023 मध्ये निर्यात बंदी लागू केली. ही निर्यात बंदी 31 मार्च 2024 पर्यंत कायम राहणार होती.
मात्र मध्यंतरी सरकारने 31 मार्चनंतर देखील निर्यात बंदी सुरूच राहणार असा निर्णय घेतला. यामुळे शासनाविरोधात शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळाली. सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा घातकी ठरला. या निर्णयामुळे कांदा बाजारावर मोठा दबाव पाहायला मिळाला.
कांदा अगदी कवडीमोल दरात विकला गेला. यामुळे शेतकरी, व्यापारी, निर्यातदार तथा शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून कांदा निर्यात बंदी मागे घेण्यासाठी सरकारवर दबाव बनवला गेला. ऐन निवडणुकीच्या काळात सरकारला कांद्याचा मुद्दा डोक्याला ताप देणारा होता.
अनेक राजकीय विश्लेषकांनी कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत फटका बसू शकतो असा अंदाज व्यक्त केला होता. यामुळे मग सरकारने घाईघाईने शेतकऱ्यांची मनधरणी करण्यासाठी कांदा निर्यात सुरू करण्यास परवानगी दिली.
कांदा निर्यात बंदी मागे घेण्याचा मोठा निर्णय झाला. मात्र हा निर्णय होऊनहीं बरेच दिवस कांदा बाजार भावावर दबाव पाहायला मिळाला. मात्र आता गेल्या दोन दिवसांपासून बाजारात थोडीशी तेजी पाहायला मिळत असून बाजारभावात सुधारणा होत आहे.
आज देखील राज्यातील काही बाजारांमध्ये कांद्याला चांगला विक्रमी भाव मिळाला आहे. दरम्यान, आज आपण राज्यातील कोणत्या बाजारात कांद्याला विक्रमी भाव मिळाला याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या बाजारात मिळाला कांद्याला विक्रमी भाव
जुन्नर आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 1100, कमाल 2810 आणि सरासरी 2400 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 700, कमाल 2600 आणि सरासरी 1500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.
पेन कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 2400, कमाल 2600 आणि सरासरी 2400 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
दौंड केडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 800, कमाल 2500 आणि सरासरी 1800 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.