Onion Rate Maharashtra : कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची संपूर्ण राज्यभर लागवड केली जाते. नासिक, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यात कांदा उत्पादन सर्वाधिक आहे. या पिकाला नगदी पिकाचा दर्जा प्राप्त आहे मात्र अनेकदा याच्या बाजारभावात चढ-उतार पाहायला मिळतात.
बाजारभावातील चढ-उतार मात्र शेतकऱ्यांसाठी खूपच मारक ठरतात. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कृषी तज्ञांच्या माध्यमातून कांदा थेट बाजारात विक्री करण्याऐवजी कांद्यावर प्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जात आहे.
जर शेतकऱ्यांनी कांदा प्रक्रिया उद्योग उभारून शेतीपूरक व्यवसाय सुरू केला तर त्यांना निश्चितच चांगली कमाई होण्याची शक्यता आहे.
कृषी तज्ञ सांगतात की, कांद्याचे बाजारभाव कधी खूपच अधिक असतात आणि कधी कांद्याला खूपच कवडीमोल दर मिळतो. यामुळे अशावेळी कांदा प्रक्रिया उद्योग फायदेशीर ठरतो.
कांदा निर्जलीकरण करून त्यापासून इतर बाय प्रॉडक्ट तयार केल्यास शेतकऱ्यांना चांगला फायदा या ठिकाणी मिळू शकणार आहेत. दरम्यान आज आपण कांदा प्रक्रिया उद्योगासाठी कोणकोणत्या मशिनरी वापराव्या लागतात याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी फ्लुईडाइज्ड बेड ड्रायिंग, व्हॅक्युम मायक्रोवेव्ह ड्रायिंग, सोलार ड्रायिंग इ. निर्जलीकरण तंत्राच्या मदतीने हवेचा वेग व तापमान नियंत्रित करून कांद्याचे मूल्यवर्धन केले जाते.
विशेष म्हणजे अशा तऱ्हेने प्रक्रिया केलेल्या कांद्याला बाजारात मोठी मागणी असते. या मालाला बाजारात अधिकचा भाव मिळतो.
यामुळे जेव्हा कमी भाव मिळत असेल तेव्हा शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय अतिरिक्त उत्पन्न कमवून देणारा ठरणार आहे. निर्जलीकरण केलेल्या कांद्याला म्हणजेच प्रक्रियायुक्त कांद्याला हॉटेल व्यवसायिकांकडून मोठी मागणी होते.
याला हॉटेल व्यवसाय चांगला भाव देतात शिवाय याला प्रदेशात देखील मागणी आहे. अशा परिस्थितीत हा व्यवसाय सुरू केल्यास शेतकऱ्यांना अधिकची कमाई करता येणार आहे.
जर शेतकऱ्यांनी या व्यवसायात चांगले लक्ष घातले आणि योग्य मार्केटिंग केली तर निश्चितच लाखो रुपयांचे कमाई या व्यवसायातून करता येणे शक्य होणार आहे.