Onion Rate Maharashtra : लोकसभा निवडणुकीनंतर कांद्याला समाधानकारक असा भाव मिळतोय. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे कांदा या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. पण, लोकसभा निवडणुकीच्या आधी कांद्याला अपेक्षित असा दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
मात्र निवडणुकीनंतर बाजारात कांद्याची मागणी वाढली आहे आणि यामुळे बाजार भाव वाढत आहेत. मात्र अशातच एक बातमी समोर येत आहे. या बातमीमुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये पॅनिक वातावरण पाहायला मिळतय.
मीडिया रिपोर्ट नुसार नाफेड लवकरच बफर स्टॉक मधील कांदा बाजारात उतरवणार आहे. असे झाल्यास बाजारात कांद्याचे भाव पडणार अशा चर्चा आहेत. नाफेड चा कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाला म्हणजे साहजिकच मालाची उपलब्धता वाढणार आहे.
बाजाराच्या समीकरणांनुसार मालाची उपलब्धता वाढली तर बाजार भाव कमी होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे. तसेच शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये नाराजी देखील वाढत आहे.
दरम्यान अशा या चर्चा सुरू असताना महाराष्ट्रातील बाजारात कांद्याला नेमका काय भाव मिळतो हे जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत आता आपण राज्यातील प्रमुख बाजारांमधील कांद्याचे रेट थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कांद्याचे भाव खालीलप्रमाणे
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 1500, कमाल 4500 आणि सरासरी 3000 असा दर मिळाला आहे.
मुंबई कांदा बटाटा मार्केट : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 2900, कमाल 3600 आणि सरासरी 3250 असा भाव मिळाला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये लाल कांद्याला किमान 700, कमाल 4500 आणि सरासरी 3400 असा भाव मिळाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 2000, कमाल 3800 आणि सरासरी 2900 असा भाव मिळाला आहे.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 1500, कमाल 4200 आणि सरासरी 3500 असा भाव मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 2 हजार, कमाल 4100 आणि सरासरी 3700 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 1500, कमाल 4145 आणि सरासरी 3800 रुपये असा भाव मिळाला आहे.
मालेगाव मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 2500, कमाल 3726 आणि सरासरी 3450 असा भाव मिळाला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 1582, कमाल 3600 आणि सरासरी 3525 असा विक्रमी भाव मिळाला आहे.