Onion Rate Maharashtra : आज विजयादशमी अर्थात दसऱ्याचा पावन पर्व साजरा होत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच विजयादशमीचा मुहूर्त. खरंतर हा सण फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित नाही. हा सण संपूर्ण देशभरात साजरा होत असतो. या सणाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशभरात मोठे उत्साहाचे वातावरण आहे.
दरम्यान दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यातील काही बाजारांमध्ये कांद्याला विक्रमी दर मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून समाधान व्यक्त करण्यात आले असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव स्पष्टपणे पाहायला मिळताय.
दसऱ्याच्या मुहूर्तावर कांद्याला चांगला विक्रमी दर मिळाला असल्याने आगामी काळात बाजार भाव आणखी कडाडतील अशी आशा देखील आता पल्लवीत झाली आहे.
राज्यातील कोणत्या बाजारांमध्ये कांद्याला मिळाला सर्वाधिक दर
आम्ही आपणास सांगू इच्छितो की आज विजयादशमीच्या मुहूर्तावर कांद्याच्या आगार म्हणून ख्यातनाम असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील उमराणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे.
बाजार समितीमध्ये आज नवीन कांद्याची आवक झाली होती. या बाजारात आज नवीन कांद्याच्या लिलावाला सुरुवात झाली असून लिलावाच्या पहिल्याच दिवशी नवीन कांद्याला विक्रमी भाव नमूद करण्यात आला आहे.
या बाजारात नवीन कांद्याला 6161 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. उमराणा येथील कांदा उत्पादक शेतकरी राजेंद्र देवरे यांच्या कांद्याला हा सर्वाधिक दर मिळाला आहे.
त्यांनी बैलगाडी मधून आज दसऱ्याच्या मुहूर्तावर कांदा विक्रीसाठी आणला होता. यामुळे देवरे यांचा आज बाजार समिती प्रशासनाच्या माध्यमातून सत्कारही करण्यात आला. उमराणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी नवीन कांद्याची आवक होत असते.
यंदाही या बाजार समितीमध्ये नवीन कांदा विक्रीसाठी दाखल करण्यात आला होता. दरम्यान आज बाजारात दाखल झालेल्या नवीन कांद्याला चांगला विक्रमी भाव मिळाला असून यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
नवीन लाल कांद्याला उमराणा एपीएमसी मध्ये तब्बल ६१६१ रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी भाव मिळाला असल्याने आगामी काळातही नवीन लाल कांदा विक्रमी भावात विकला जाईल अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे.