Onion Rate Maharashtra : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर आज भाऊबीज. भाऊबीज निमित्ताने संपूर्ण देशात अगदीच आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतंय.
आज भाऊबीज असल्याने राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होत्या. मात्र राज्यातील काही बाजारांमध्ये आज कांद्याचे लिलाव झाले आहेत. धाराशिव, भुसावळ, पुणे, पुणे खडकी, पुणे पिंपरी आणि मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याचे लिलाव झालेत.
दरम्यान आज झालेल्या लिलावात राज्यातील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक दर मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आजच्या लिलावात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल 5400 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
या मार्केटमध्ये आज कांद्याची 540 क्विंटल एवढी आवक झाली होती. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये लोकल कांद्याला किमान एक हजार पाचशे, कमाल 5400 आणि सरासरी 3450 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. आता आपण राज्यातील इतर बाजारांमधील कांद्याचे दर अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारांमधील कांदा बाजार भाव खालीलप्रमाणे
धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समिती : आजच्या लिलावात या मार्केटमध्ये लाल कांद्याला किमान 3000, कमाल 3000 आणि सरासरी 3000 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज लाल कांद्याला किमान 2500, कमाल 3200 आणि सरासरी 2800 असा दर मिळाला.
पुणे खडकी कृषी उत्पन्न बाजार समिती : भाऊबीजेच्या मुहूर्तावर खडकी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याला किमान 1700 कमाल, 3600 आणि सरासरी 2650 असा भाव मिळाला आहे.
पुणे पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 2800, कमाल 4800 आणि सरासरी 3800 असा दर मिळाला आहे.
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात भाऊबीजेच्या मुहूर्तावर कांद्याला किमान 200, कमाल 4,100 आणि सरासरी 2410 असा दर मिळाला आहे.