Onion Rate Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे बाजार भाव तेजीत आहेत. लोकसभा निवडणुकीआधी कवडीमोल दरात विक्री होणारा कांदा निवडणुकीनंतर तेजीत आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आता कुठे दिलासा मिळत आहे.
दरम्यान आता राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आनंद पुन्हा एकदा द्विगुणीत होणार आहे. कारण की, राज्यातील एका प्रमुख बाजारात कांद्याला पाच हजाराचा भाव मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला कमाल 5000 रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी दर मिळाला आहे.
निवडणुकीनंतर प्रथमच सोलापूर एपीएमसी मध्ये हा विक्रमी दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. आज या मार्केटमध्ये लाल कांद्याची वीस हजार 60 क्विंटल एवढी विक्रमी आवक झाली होती.
यामध्ये कांद्याला किमान 1000, कमाल 5000 आणि सरासरी 3700 असा भाव मिळाला आहे. दरम्यान आता आपण राज्यातील इतर प्रमुख बाजारांमधील कांदा बाजार भाव थोडक्यात जाणून घेणार आहोत.
राज्यातील प्रमुख बाजारांमधील भाव?
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला किमान 1900, कमाल ४०५७ अन सरासरी 3780 रुपये असा भाव मिळाला आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या एपीएमसी मध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 4001 आणि सरासरी 3750 असा दर मिळाला आहे.
कोपरगाव शिरसगाव तिळवणी कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला किमान 2 हजार, कमाल 3950 आणि सरासरी 3328 रुपये असा भाव मिळाला आहे.
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला किमान 1800, कमाल 4195 आणि सरासरी 3750 असा भाव मिळाला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात उन्हाळी कांद्याला किमान 1200, कमाल 3886 आणि सरासरी 3700 रुपये भाव मिळाला आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला किमान 3000, कमाल 3900 आणि सरासरी 3600 असा भाव मिळाला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती : येवल्याच्या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 800, कमाल 3850 आणि सरासरी 3550 असा भाव मिळाला आहे.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : कोल्हापूरच्या बाजारात आज कांद्याला किमान 1500, कमाल 4500 आणि सरासरी 3200 असा दर मिळाला आहे.