Onion Rate Maharashtra News : आज महाराष्ट्रात बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबारसह राज्यातील बहुतांशी भागात बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याहीवर्षी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण दरवर्षी साजरा होत असतो.
पिठोरी अमावस्याला बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो. हा सण बैलांचा असून या दिवशी बैलांना कोणतेच काम लावले जात नाही. हा सण शेतकरी बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी बैलांना सजवले जाते, त्यांना पुरणपोळीचे नैवेद्य दिले जाते. म्हणून आज राज्यातील बहुतांशी बाजार समित्या बंद आहेत.
तरीही आज राज्यातील काही बाजारांमध्ये कांद्याचे लिलाव झाले आहेत. अशा परिस्थितीत आज आपण बैलपोळ्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील बाजारांमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कुठं मिळाला कांद्याला सर्वोच्च भाव ?
हिंगणा कृषी उत्पन्न बाजार समिती : आज या बाजारात लाल कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे. या मार्केटमध्ये आज लाल कांद्याला किमान 3500, कमाल 5000 आणि सरासरी 4166 असा भाव झाला आहे.
कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 3500, कमाल 4500 आणि सरासरी 4000 असा भाव मिळाला आहे.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 1500, कमाल 4500 आणि सरासरी 3000 असा भाव मिळाला आहे.
शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज एक नंबर कांद्याला किमान 3500, कमाल 4200 आणि सरासरी 3750 असा भाव मिळाला आहे.
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 1000, कमाल 4220 आणि सरासरी 4000 असा दर मिळाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : पुण्याच्या बाजारात आज कांद्याला किमान 2800, कमाल 4200 आणि सरासरी 3500 असा भाव मिळाला आहे.
सांगली फळे भाजीपाला मार्केट : या बाजारात आज कांद्याला किमान 2200, कमाल 4200 आणि सरासरी 3200 असा भाव मिळाला आहे.