Onion Rate Maharashtra News : लोकसभा निवडणुकीनंतर कांदा बाजार भावात सुधारणा झाली. बरीच महिने कवडीमोल दरात कांदा विकल्यानंतर निवडणुकीनंतर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे वाटत असतानाच केंद्रातील सरकारने नाफेडचा बफर स्टॉक मधील कांदा खुल्या बाजारात विक्रीसाठी आणण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाचे म्हणजे नाफेडचा बफर स्टॉकमधील कांदा आता खुल्या बाजारात 35 रुपये प्रति किलो या दराने विकलाही जात आहे. यामुळे बाजारात कांद्याची उपलब्धता वाढेल आणि सहाजिकच शेतकऱ्यांच्या मालाला अपेक्षित असा भाव मिळणार नाही, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे.
म्हणून पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कवडीमोल दरात कांदा विकावा लागणार की काय ? अशी भीती भेडसावत असतानाच शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. आज महाराष्ट्रातील एका बाजारात कांद्याला तब्बल 6700 रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी दर मिळाला आहे.
कोणत्या बाजारात मिळाला कांद्याला सर्वाधिक दर
महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आज शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला सर्वाधिक सहा हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी भाव मिळाला आहे.
या बाजारात आज लाल कांद्याची 289 क्विंटल एवढी आवक झाली होती. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये लाल कांद्याला किमान 2800, कमाल 6700 आणि सरासरी 3111 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.
याशिवाय आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पांढरा कांद्याला किमान 1000, कमाल 5200 आणि सरासरी 3500 असा भाव मिळाला आहे.
तसेच हिंगणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज लाल कांद्याला किमान 3200, कमाल 5 हजार आणि सरासरी 3200 असा भाव मिळाला आहे.