Onion Rate Maharashtra : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. पुन्हा एकदा कांद्याच्या बाजारभावात सुधारणा झाली आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये कांद्याचे दर टिकून आहेत. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसात कांदा दरात मोठी सुधारणा झाली आहे. खरे तर लोकसभा निवडणुकीआधी बाजारात कांद्याला अपेक्षित भाव मिळत नव्हता.
त्यामुळे अनेकांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता आला नाही. पण आता निवडणुकीनंतर चित्र पूर्णपणे बदलले आहे. राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये बाजारभावात चांगली वाढ झाली आहे. आता कांदा बाजारभावाची सहा हजाराच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून नाफेड बफर स्टॉकमधील कांदा बाजारात उतरवणार अशा चर्चा सुरू आहेत. यामुळे बाजार भाव घसरण्याची भीती व्यक्त होत आहे. पण नाफेड चा कांदा 10 सप्टेंबर नंतरच बाजारात येणार अस दिसतय.
यामुळे कांद्याचा बाजारभावावर 10 सप्टेंबर पर्यंत तरी कोणताच परिणाम होणार नाहीये. दरम्यान आज राज्यातील चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक दर मिळाला आहे. या मार्केटमध्ये कांद्याला कमाल 5500 एवढा भाव मिळाला आहे.
म्हणजे आता कांदा दराची सहा हजाराकडे वाटचाल सुरु झाली आहे. दरम्यान आता आपण राज्यातील कोणकोणत्या बाजारात कांद्याला चांगला विक्रमी दर मिळाला याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्यातील कोणत्या बाजारांमध्ये कांद्याला मिळाला विक्रमी दर?
चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 3500, कमाल 5500 आणि सरासरी 4250 असा विक्रमी दर मिळाला आहे.
अमरावती फळे आणि भाजीपाला मार्केट : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 3200, कमाल 5200 आणि सरासरी 4200 असा भाव मिळाला आहे.
पुणे मांजरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान दोन हजार, कमाल 5000 आणि सरासरी 4500 असा भाव मिळाला आहे.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती : बारामती एपीएमसी मध्ये आज कांद्याला किमान 700, कमाल 4500 आणि सरासरी 3400 असा दर मिळाला आहे.
वडगाव पेठ कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 3800, कमाल 4500 आणि सरासरी 4000 असा भाव मिळाला आहे.
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1700, कमाल 4300 आणि सरासरी 3700 असा भाव मिळाला आहे.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 500, कमाल 4000 आणि सरासरी 3200 असा भाव मिळाला आहे.