Onion Rate Maharashtra : केंद्र शासनाने कांदा निर्यातीसाठी 40% शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. कांद्याच्या वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या निर्णयानंतर कांदा बाजारात थोडीशी घसरण देखील झाली आहे.
त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध केला जात आहे. विशेष बाब अशी की केंद्र शासनाच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बेमुदत काळासाठी बंद करण्यात आल्या होत्या. मात्र केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या मध्यस्थीनंतर नाशिक जिल्ह्यातील लिलाव पुन्हा एकदा सुरू झाले आहेत.
कालपासून नाशिक जिल्ह्यातील लिलाव पुन्हा एकदा पूर्वपदावर आले असून आज देखील जिल्ह्यातील बाजारात कांद्याचे लिलाव झाले आहेत. दरम्यान आज आपण केंद्र शासनाने निर्यात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजारात उन्हाळी कांद्याला काय भाव मिळाला आहे, याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
नाशिक जिल्ह्यात काय भाव मिळाला?
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज 7200 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली होती. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 900 रुपये, कमाल 2623 रुपये आणि सरासरी 2150 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : आशिया खंडातील या सर्वात मोठ्या मार्केटमध्ये आज 4752 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली होती. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 600 रुपये, कमाल 2417 रुपये आणि सरासरी 2150 रुपये असा भाव मिळाला आहे.
लासलगाव निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निफाड या उपबाजारात आज 1500 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 800, कमाल 2300 आणि सरासरी 2000 एवढा भाव मिळाला आहे.
लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती : लासलगाव एपीएमसी अंतर्गत येणाऱ्या विंचुर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 3500 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. आजचे आलेला वाद या मार्केटमध्ये कांद्याला किमान 700, कमाल 2352 आणि सरासरी 2100 रुपये एवढा भाव मिळाला आहे.
मालेगाव मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज 10500 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 650 रुपये प्रति क्विंटल किमान, 2280 रुपये प्रति क्विंटल कमाल, 1950 रुपये प्रतिक्विंटल सरासरी भाव मिळाला आहे.