Onion Rate : आपल्या देशात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. आपल्या देशात कांद्याचा खपही मोठा आहे. शिवाय देशातून मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात केली जाते. देशात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, बिहार, कर्नाटक या राज्यांमध्ये कांद्याचे सर्वाधिक उत्पादन पाहायला मिळते. या सर्वांशिवाय राजस्थान, हरियाणा आणि तेलंगणामध्येही कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र या राज्यांमध्ये कांद्याचे उत्पादन आपल्या राज्यापेक्षा फारच कमी आहे.
आपल्या राज्याबाबत बोलायचं झालं तर महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक मोठे कांदा उत्पादक राज्य. देशाच्या एकूण उत्पादनापैकी 70% हून अधिकचे उत्पादन एकट्या महाराष्ट्रात घेतले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या राज्यात सुमारे ५.०८ लाख हेक्टरवर कांद्याची लागवड केली जाते.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या राज्यात कांद्याचे खरीप, लेट खरीप आणि रब्बी अशा तीनही हंगामात याचे उत्पादन घेतले जाते. महत्त्वाचे म्हणजे आपल्या राज्यात आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ सुद्धा आहे. ही बाजारपेठ कांद्याचे आगार म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नाशिक जिल्ह्यात आहे.
खरे तर कांदा हे एक महत्वाचे नगदी पिक आहे. मात्र कांद्याच्या बाजारभावात नेहमीच लहरीपणा पायाला मिळतो. कधी कांद्याला खूपच विक्रमी भाव मिळतो तर कधी कांद्याचे दर खूपच कमी होतात. यामुळे मात्र शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. लोकसभा निवडणुकीपूर्वी कांद्याला फारच कवडीमोल दर मिळत होता.
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. निवडणुकीनंतर मात्र कांद्याचे बाजार भाव सुधारले आहेत. आपल्या राज्यात देखील कांदा आता बऱ्यापैकी दर मिळतोय. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानी वातावरण आहे. महाराष्ट्रात कांद्याचे कमाल बाजार भाव 4500 रुपये पर्यंत पोहोचले आहेत. तसेच सरासरी दर 2300 ते 3500 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान आहेत.
मात्र कांद्याला सर्वाधिक भाव केरळमध्ये मिळतोय. केरळमधील एका बाजारात कांद्याला इतिहासातील सर्वाधिक दर मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार केरळ येथील पोथेनकोडे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल 27 हजार 680 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच या बाजारात 27,600 प्रतिक्विंटल एवढा किमान आणि 27 हजार 640 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.
तथापि केरळमध्ये कांद्याचे उत्पादन फारच कमी आहे. एक तर केरळमध्ये कांद्याचे उत्पादन फारच कमी होते आणि दुसरे म्हणजे त्या ठिकाणी सध्या कांद्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. हेच कारण आहे की केरळमध्ये कांद्याला इतिहासातील सर्वाधिक भाव मिळाला आहे. दरम्यान आता आपण राज्यातील प्रमुख बाजारांमधील उन्हाळी कांद्याचे भाव थोडक्यात जाणून घेणार आहोत.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 550, कमाल 3351 आणि सरासरी 3100 असा भाव मिळाला आहे.
येवला अंदरसुल कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 600, कमाल 3377 आणि सरासरी 3275 असा भाव मिळाला आहे.
लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 2000, कमाल 3360 आणि सरासरी 3200 असा भाव मिळाला आहे.
सिन्नर नायगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1500, कमाल 3321 आणि सरासरी 3150 असा दर मिळाला आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये अजूनही कांद्याला किमान 1600, कमाल 3200 आणि सरासरी 2900 भाव मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 1300, कमाल 4126 आणि सरासरी 3280 असा भाव मिळाला आहे.