Onion Rate : केंद्रातील जुलमी सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विचार न करता 30 ऑगस्टला एक अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेनुसार, नाफेडचा कांदा आता बाजारात येणार आहे. यामुळे आगामी काळात कांद्याचे बाजार भाव पडतील अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. मात्र नाफेडचा बफर स्टॉक मधील कांदा बाजारात दाखल होण्यापूर्वीचं बाजारात कांद्याला चांगला विक्रमी दर मिळतोय.
तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, नाफेडचा कांदा हा बाजारात 11 सप्टेंबर नंतर चमकू शकतो. नाफेड कडून आता ज्या ठिकाणी कांद्याची सर्वाधिक मागणी आहे तिथे बफर स्टॉकमधील कांदा पोहच केला जाणार आहे. यामुळे कांद्याची उपलब्धता वाढेल आणि बाजार भाव घसरतील अशी भीती व्यक्त होत आहे.
पण नाफेडचा कांदा बाजारात येण्यासाठी आणखी काही दिवसांचा काळ बाकी आहे. यामुळे तोवर कांद्याचे दर चढेच राहणार आहेत. आजही राज्यातील काही बाजारांमध्ये कांद्याला चांगला विक्रमी भाव मिळाला आहे.
काही बाजारात कांद्याचे दर सहा हजाराच्या घरात पोहोचले असून यामुळे सर्वसामान्य शेतकरी अगदीचं आनंदी झाले आहेत. पण जेव्हा नाफेडचा बफर स्टॉक मधील कांदा खुल्या बाजारात येईल तेव्हा बाजार भाव असेच कायम राहतील का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक भाव
चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 3500, कमाल 5500 आणि सरासरी 4500 असा भाव मिळाला आहे.
अमरावती फळे आणि भाजीपाला मार्केट : आजच्या लिलावात या मार्केटमध्ये लाल कांद्याला किमान 3500, कमाल 5500 आणि सरासरी 4500 असा दर मिळाला आहे.
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 2500, कमाल 5,100 आणि सरासरी 4500 असा भाव मिळाला आहे.
हिंगणा कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज लाल कांद्याला किमान 4000, कमाल 5000 आणि सरासरी 4500 असा भाव मिळाला आहे.
वडगाव पेठ कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 4000, कमाल 5000 आणि सरासरी 4500 असा भाव मिळाला आहे.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 1500, कमाल 5000 आणि सरासरी 3400 असा भाव मिळाला आहे.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : पारनेरच्या एपीएमसी मध्ये आजच्या लिलावात उन्हाळी कांद्याला किमान 1500, कमाल 4800 आणि सरासरी 3600 असा भाव मिळाला आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 2800, कमाल 4500 आणि सरासरी 3750 असा भाव मिळाला आहे.
लासलगाव निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती : लासलगाव एपीएमसी च्या निफाड येथील उप बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान दोन हजार, कमाल 4020 आणि सरासरी 3950 असा भाव मिळाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 3300, कमाल 4500 आणि सरासरी 3900 असा भाव मिळाला आहे.