Onion Rate : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे कांद्याच्या सरासरी बाजारभावात सुधारणा झाली आहे. खरे तर नोव्हेंबर महिन्यात कांद्याला चांगला भाव मिळत होता. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता.
किरकोळ बाजारात कांदा तब्बल 80 ते 90 रुपये प्रति किलो यादरात विकला जात होता. घाऊक बाजारात देखील 40 ते 50 रुपये प्रति किलो असा कमाल दर कांद्याला मिळत होता.
विशेष म्हणजे सरासरी बाजार भाव देखील 35 ते 38 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचले होते. मात्र यानंतर शासनाने किरकोळ बाजारातील किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत.
किरकोळ बाजारात केंद्र शासनाने 25 रुपये प्रति किलो या दरात कांदा उपलब्ध करून दिला. बफर स्टॉकमधील कांदा बाजारात उपलब्ध झाल्याने देशांतर्गत कांद्याची उपलब्धता वाढली यामुळे कांदा दरात मोठी घसरण झाले.
याशिवाय कांदा निर्यात शुल्क वाढवण्याचा देखील निर्णय शासनाने घेतला. याचा परिणाम म्हणून गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर दबावात आहेत.
यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून निघत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान काल झालेल्या लिलावात राज्यातील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला भाव मिळाला आहे.
कालच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याच्या सरासरी बाजार भावात सुधारणा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र कमाल बाजारभावात किंचित घसरन झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल अर्थात 4 जानेवारी 2023 रोजी 71 हजार 862 क्विंटल कांद्याची आवक झाली. यातील बारा क्विंटल कांद्याला प्रति किलो एक रुपये म्हणजेच 100 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.
तर उर्वरित कांद्याला सरासरी 1700 रुपये प्रति क्विंटलचा भाव नमूद करण्यात आला आहे. तर अवघ्या 5 क्विंटल कांद्याला 2800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.
बाजार समिती प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार केल्या काही दिवसांच्या तुलनेत कालच्या लिलावात सरासरी बाजारभाव शंभर रुपयांची वाढ झाली आहे. मात्र कमालदारात कालच्या लिलावात 700 रुपयांपर्यंतची घट नमूद करण्यात आली आहे.