Onion Rate Hike : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रसह संपूर्ण देशभरात कांद्याला अतिशय नगण्य दर मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. कांदा मात्र चार रुपये प्रति किलो ते सात रुपये प्रति किलो यादरम्यान विकला गेला आहे.
निश्चितच काही बाजारात तुरळक मालाला चांगला भाव मिळाला आहे मात्र सरासरी बाजारभावाचा विचार केला तर चार रुपये प्रति किलो ते सात रुपये प्रति किलो एवढाच भाव सध्या बाजारात पाहायला मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण मेटाकुटीला आले आहे.
दरम्यान राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने कांद्याला अनुदान देण्याचा निर्णय देखील घेतला आहे. लेट खरीप हंगामातील कांद्याला 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान 200 क्विंटलच्या मर्यादेत आता मिळणार आहे. सोबतच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता लाल कांद्याला दर न मिळण्यामागे अनेक कारणे होती.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! 10 मे ला सुरू होणार आणखी एक वंदे भारत ट्रेन; PM मोदी दाखवणार हिरवा झेंडा ! कोणत्या मार्गांवर धावणार? पहा….
यामध्ये लाल कांद्याचे वाढलेले क्षेत्र अन उत्पादन हे मुख्य कारण ठरले. या सोबतच महाराष्ट्र व्यतिरिक्त उत्तर भारतात देखील मोठ्या प्रमाणात खरीप हंगामात कांद्याचे उत्पादन घेतले गेले. परिणामी उत्तर भारतातून महाराष्ट्राच्या कांद्याला मागणी राहिली नाही. शिवाय यामुळे देशांतर्गत मुबलक प्रमाणात कांदा उपलब्ध झाला. यामुळे साहजिकच मागणी कमी आणि पुरवठा अधिक अशी परिस्थिती तयार झाली अन दरात मोठी घसरण पाहायला मिळाली.
यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितच फटका बसला आहे मात्र आता उन्हाळी कांदा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण की, उन्हाळी कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता तज्ञ लोकांची माध्यमातून व्यक्त केली जात आहे. खरं पाहता गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात भाग बदलत अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे उन्हाळी हंगामातील काढणीयोग्य कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! कोकणानंतर आता म्हाडा मुंबई मंडळाची लॉटरी काढणार; केव्हा निघणार लॉटरी? पहा….
शिवाय, गारपिटीचा फटका बसलेला उन्हाळी हंगामातील कांदा आता अधिक काळ टिकण्यास असमर्थ राहणार आहे. म्हणजेच असा कांदा लवकर सडू शकतो असं मत जाणकार लोकांनी व्यक्त केल आहे. त्यामुळे जे शेतकरी अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेला कांदा चाळीत साठवतील त्यांचा कांदा कदाचित लवकर खराब होऊ शकतो.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे आणि गारपिटीमुळे जवळपास 30 टक्के उन्हाळी कांदा उत्पादन कमी होणार आहे. तसेच, बहुतांशी शेतकऱ्यांनी अवकाळी पावसात सापडलेला कांदा आत्ताच विक्री करून टाकला आहे. जवळपास 50% शेतकऱ्यांचा कांदा हा कांदा चाळीत साठवलेला राहणार आहे. मात्र या बराकीतील कांदा देखील लवकरच खराब होण्याची भीती आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांचा कांदा चांगला असेल त्या शेतकऱ्यांना याचा निश्चितच फायदा होणार आहे.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी खुशखबर ! आता वाहतूक कोंडीतून होणार सुटका; ‘या’ मार्गावर विकसित होणार नवीन पूल, वाचा…..
कारण की, यंदा उन्हाळी कांदा चांगल्या भागात विक्री होण्याची शक्यता आहे. जुलै ते ऑगस्ट महिन्यात उन्हाळी कांद्याला चांगला भाव मिळू शकतो. कांदा उत्पादनात आलेली घट, अवकाळी पावसामुळे काढणी योग्य कांद्याचे झालेल नुकसान, आणि चाळीतला कांदा लवकरच खराब होण्याची शक्यता, यामुळे जुलै ते ऑगस्ट महिन्यात कांद्याची मागणी वाढेल आणि पुरवठा कमी होईल म्हणजेच आवक कमी राहील परिणामी दरात वाढ होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.
विशेष बाब म्हणजे उत्तरेकडील राज्यात फारसा उन्हाळी हंगामातील कांदा उत्पादित होत नसल्याचे काही तज्ञ सांगत आहेत कारण की त्या राज्यात कांदा साठवणुकीसाठी फारसे प्रगत तंत्रज्ञाने नाहीत. अशा परिस्थितीत उन्हाळी हंगामातील कांदा उत्पादन हे यंदा फारच कमी राहणार आहे. यामुळे जुलै-ऑगस्ट महिन्यात दरात वाढ होण्याची शक्यता जाणकार लोकांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे.
हे पण वाचा :- काश्मीरच सफरचंद महाराष्ट्राच्या मातीत फुलल; प्रयोगशील शेतकऱ्याने फक्त 100 झाडातून कमवले दिड लाख, वाचा….