Onion Rate : कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची संपूर्ण राज्यभर लागवड केली जाते. उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण मध्य महाराष्ट्रात कांद्याची लागवड विशेष उल्लेखनीय असल्याचे पाहायला मिळते. मराठवाडा आणि विदर्भ विभागातही कांदा लागवड केली जाते मात्र तेथे खूपच कमी प्रमाणात या पिकाची लागवड होते.
दुसरीकडे, कोकणातही कांद्याचे उत्पादन घेतले जाते मात्र कोकणात पांढरा कांदा उत्पादित होतो. म्हणजेच संपूर्ण राज्यात कांदा या पिकाची कमी-अधिक प्रमाणात लागवड होते.
यामुळे महाराष्ट्रात कांदा हा फक्त शेतकऱ्यांचे अर्थकारणच ठरवत नाही तर सत्ता ठरवण्यात देखील कांद्याचा मोठा सिंहाचा वाटा आहे. ज्यांनी कांद्याकडे संवेदनशीलपणे पाहिले नाही त्यांचा कांदा परफेक्ट वांदा करतो. हे आपण लोकसभा निवडणुकीत पाहिलंच.
बलाढ्य सत्ताधाऱ्यांना कांद्याच्या मुद्द्याने खऱ्या अर्थाने निवडणुकीत पराभूत केले. त्यामुळे निवडणुकीच्या काळात कांद्याचा मुद्दा विशेष चर्चेत राहिला. मात्र निवडणुकीनंतरही हा कांद्याचा मुद्दा चर्चेतच आहे. राज्यात आता एक नवीन चर्चा सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने या चर्चांना अजून उधान मिळतं आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाफेड बफर स्टॉक मधील कांदा खुल्या बाजारात उतरवणार आहे. असं झालं तर बाजारात दर कमी होतील अशी भीती व्यक्त होत आहे.
यामुळे या चर्चामुळे कांदा बाजारावर काही परिणाम झाला आहे का हे आज आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. आठवड्याच्या पहिल्या दिवशी राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये उन्हाळी कांद्याला काय भाव मिळाला आहे याविषयी आतां आपण माहिती पाहणार आहोत.
लासलगाव-निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1700, कमाल 3421 आणि सरासरी 3311 असा भाव मिळाला आहे.
लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1500, कमाल 3351 आणि सरासरी 3250 असा भाव मिळाला आहे.
सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दोन हजार, कमाल 3275 आणि सरासरी 3200 असा भाव मिळाला आहे.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 500, कमाल 3600 आणि सरासरी 3200 असा दर मिळाला आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1500, कमाल 3800 आणि सरासरी 2650 असा भाव मिळाला आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात अजूनही कांद्याला किमान 1400, कमाल 3291 आणि सरासरी तीन हजार पंचवीस असा भाव मिळाला आहे.
कुठं मिळाला सर्वाधिक भाव?
आज विदर्भातील चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक दर मिळाला आहे. या बाजारात आज कांद्याला किमान 3000, कमाल 4750 आणि सरासरी 3750 असा भाव मिळाला आहे.