Onion Rate : कांदा हे महाराष्ट्रात उत्पादीत होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. या पिकाची राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लागवड केली जाते. मध्य महाराष्ट्रात कांद्याची शेती सर्वात जास्त होते. मराठवाडा आणि विदर्भातही याची लागवड होते.
एकूणच राज्यातील बहुतांशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. मात्र कांदा बाजार भावाचा प्रश्न नेहमीच शेतकऱ्यांना सतावत असतो. कांद्याला कधी खूपच चांगला दर मिळतो तर काही प्रसंगी या पिकासाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांना वसूल करता येत नाही.
या अशा लहरीपणामुळे मात्र शेतकऱ्यांची मोठी कोंडी होते. लोकसभा निवडणुकीच्या आधी तर कांदा उभा एक ते दोन रुपये प्रति किलो या दराने विकला जात होता. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर कांद्याचे बाजार भाव वाढले आहेत.
अशातच आता बांगलादेशातून शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. बांगलादेशाने कांदा आयात शुल्क हटवले असल्याची माहिती हाती येत आहे. मात्र, हा निर्णय फक्त पुढील दोन महिन्यांकरीता हा निर्णय घेण्यात आला आहे.
मागील अनेक महिन्यापासून बांगलादेशाने कांद्यासाठी आयात शुल्क लावले होते. त्यामुळे भारतातून बांगलादेशात कांदा निर्यात होत नव्हता, शिवाय अपेक्षित बाजारभाव देखील मिळत नव्हता. पण, आता बांगलादेशच्या राष्ट्रीय महसूल मंडळाने (NBR) कांद्याच्या आयातीवरील सीमाशुल्क आणि नियामक शुल्क पूर्णपणे मागे घेतले आहे.
याबाबतचे परिपत्रक देखील निर्गमित करण्यात आले आहे. 15 जानेवारी 2025 पर्यंत हे आयात शुल्क मागे घेण्याचा निर्णय बांगलादेशने घेतला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ३१ ऑक्टोबरला, बांगलादेश येथील व्यापार आणि शुल्क आयोगाने कांद्याच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्याच्या ५ टक्के सीमाशुल्क पूर्णपणे मागे घेण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता.
आता याच संदर्भात आता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता भारतातील व्यापाऱ्यांना कांद्याची निर्यात थेट बंगलादेशात करता येणार असे बोलले जात आहे. यामुळे आगामी काळात कांद्याला चांगला भाव मिळणार अशी आशा बाजार अभ्यासाकांकडून वर्तवण्यात आली आहे.
यामुळे नक्कीच राज्यातील कांदा उत्पादकांना देखील याचा फायदा होणार आहे. भारतातून कांद्याची निर्यात वाढली तर देशात बाजारभाव वाढतील असे बाजारातील अभ्यासकांकडून सांगितले जात आहे.