Onion Rate : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. गणेशोत्सवानंतर प्रथमच उन्हाळी कांदा कडाडला आहे. उन्हाळी कांदा बाजार भावात मोठी वाढ नमूद करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिकचा भाव मिळाला आहे.
यामुळे नाशिक सहित संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहायला मिळत आहेत. नाशिक, अहमदनगर सहित मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये उन्हाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात उन्हाळी कांद्याचे सर्वाधिक उत्पादन होते.
आता उन्हाळी कांद्याच्या बाजारभाव वाढ झाली असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना नक्कीच याचा फायदा होणार आहे. आता आपण राज्यातील प्रमुख बाजारांमधील उन्हाळी कांदा बाजार भाव अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये उन्हाळी कांद्याला काय भाव मिळाला ?
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : नाशिक जिल्ह्यातील या बाजारात आज 9000 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली होती. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला किमान 2500, कमाल 5 हजार 551 आणि सरासरी 4750 असा भाव मिळाला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारातही उन्हाळी कांद्याला चांगला दर मिळाला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या एपीएमसी मध्ये आज उन्हाळी कांदा किमान 3500, कमाल 4720 आणि सरासरी 4550 या दरात विकला गेला आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांदा किमान 1833, कमाल 4606 आणि सरासरी चार हजार 210 या दराने विकला गेला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1250, कमाल 4500 आणि सरासरी 4150 असा भाव मिळाला आहे.
लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती : लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान दोन हजार, कमाल 4516 आणि सरासरी 4350 असा भाव मिळाला आहे.