Onion Rate : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अहमदनगर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील उन्हाळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही बातमी अधिक खास ठरणार आहे. कारण की उन्हाळी कांद्याने प्रथमच पाच हजार रुपयांचा टप्पा गाठला आहे. काल झालेल्या लिलावात राज्यातील एका महत्त्वाच्या बाजारात उन्हाळी कांद्याला तब्बल 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल भाव मिळाला आहे.
खरंतर लोकसभा निवडणुकीच्या आधी कांद्याला फारच कवडीमोल दर मिळत होता. अगदीच रद्दीपेक्षा कमी भावात कांद्याची विक्री करावी लागत होती. यामुळे पिकासाठी आलेला खर्च देखील भरून निघत नव्हता. परिणामी उत्पादक शेतकरी बांधव कर्जबाजारी झाले होते.
पण लोकसभा निवडणुकीनंतर बाजाराचे हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. गेल्या काही दिवसांपासून कांदा बाजारभावात चांगली सुधारणा झाली असून बाजार भाव आता टिकून आहेत. मात्र अशातच नाफेडने बफर स्टॉक मधील कांदा खुल्या बाजारात विक्रीसाठी आणला आहे.
अवघा 35 रुपये प्रति किलो या भावात ग्राहकांना कांदा उपलब्ध करून दिला जाणार आहे. याचा परिणाम म्हणून मार्केटमध्ये कांद्याची उपलब्धता वाढणार आहे आणि साहजिकच याचा दबाव हा बाजारभावावर येणार आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याची मागणी घसरणार आणि बाजारभावावर विपरीत परिणाम होणार अशी भीती व्यक्त होत आहे. मात्र असे असले तरी काल 8 सप्टेंबर 2024 रोजी राज्यातील काही बाजारांमध्ये कांद्याला विक्रमी दर मिळाला आहे.
कुठे मिळाला विक्रमी भाव
जुन्नर ओतूर कृषी उत्पन्न बाजार समिती : रविवारी झालेल्या लिलावात जुन्नर ओतूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दोन हजार, कमाल 5000 आणि सरासरी 4000 असा विक्रमी दर मिळाला आहे.
कोपरगाव शिरसगाव तिळवणी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कालचा लिलावात उन्हाळी कांद्याला किमान 1500, कमाल 4250 आणि सरासरी 3970 असा विक्रमी भाव मिळाला आहे.
रामटेक कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला किमान चार हजार, कमाल 5000 आणि सरासरी 4500 असा विक्रमी भाव मिळाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : येथे लोकल कांद्याला किमान 3000, कमाल 4500 आणि सरासरी 3750 असा भाव मिळाला आहे.
पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समिती : रविवारच्या लिलावात या बाजारात लाल कांद्याला किमान 1000, कमाल 4,400 आणि सरासरी 3000 असा भाव मिळाला आहे.
जुन्नर आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समिती : आळेफाटा या उप बाजारात चिंचवड कांद्याला किमान 2700, कमाल 4710 आणि सरासरी 4100 असा भाव मिळाला आहे.
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 500, कमाल 4600 आणि सरासरी 3400 असा भाव मिळाला आहे.
दौंड केडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 1500, कमाल 4500 आणि सरासरी 3800 असा भाव मिळाला आहे.