Onion Rate : केंद्रातील सरकारने शेतकऱ्यांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. खर तर, गेल्या काही महिन्यांपूर्वी केंद्रातील सरकारने कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कांदा निर्यात सुरू करताना काही जाचक अटी देखील लागू करण्यात आल्या होत्या. कांदा निर्यातीसाठी किमान निर्यात मूल्य आणि 40 टक्के निर्यात शुल्क आकारण्याच ठरवलं होत.
दरम्यान आता केंद्रातील सरकारकडून कांदा निर्यातीसाठी किमान निर्यात मूल्याची अट शिथिल करण्यात आली आहे अन निर्यात शुल्क देखील निम्म्याने कमी करण्यात आले आहे. कांदा निर्यात शुल्क आता 20 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे.
यामुळे कांद्याची निर्यात वाढली असून कांद्याचे बाजार भाव देखील सुधारले आहेत. आज राज्यातील विदर्भ विभागातील चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला किमान 6000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला आहे.
राज्यातील इतरही बाजारांमध्ये आज कांद्याला समाधानकारक भाव मिळाला असून आता आपण राज्यातील काही प्रमुख बाजारांमधील आजचे कांदा बाजार भाव थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्यातील प्रमुख बाजारांमधील कांदा बाजारभाव?
चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 4000, कमाल 6000 आणि सरासरी 5000 असा दर मिळाला आहे.
अमरावती फळे आणि भाजीपाला मार्केट : या बाजारात आज कांद्याला किमान 3000 कमाल 5500 आणि सरासरी 4250 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 2 हजार, कमाल 5500 अन सरासरी 5100 असा भाव मिळाला आहे.
वाई कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 3000, कमाल 5500 अन सरासरी चार हजार पाचशे असा भाव मिळाला आहे.
शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज लाल कांद्याला किमान 2350, कमाल 5300 आणि सरासरी 3900 असा भाव मिळाला आहे.
पुणे पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 3000, कमाल 5200 आणि सरासरी चार हजार 100 असा भाव मिळाला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान 4000, कमाल 5200 आणि सरासरी 4900 मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 2500, कमाल 5702 आणि सरासरी 4500 असा भाव मिळाला आहे.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 1500, कमाल 5000 आणि सरासरी चार हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 1500, कमाल 5000 आणि सरासरी 4500 असा भाव मिळाला आहे.