Onion Rate : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लोकसभा निवडणुकीआधी कवडीमोल दरात विकला जाणारा कांदा आता तेजीत आला आहे. वाढती मागणी आणि मालाची टंचाई यामुळे कांद्याला विक्रमी दर मिळतोय. कांदा निर्यातीसाठी निर्बंध असतानाही सध्या देशांतर्गत कांद्याचे दर कडाडले आहेत.
यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. आज राज्यातील मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक दर मिळाला आहे. या बाजारात आज कांद्याला कमाल 5000 चा भाव मिळाला आहे. या बाजारात आज कांद्याला किमान 2500 अन सरासरी 4300 चा भाव मिळाला आहे. आता आपण राज्यातील इतर बाजारांमधील दर पाहणार आहोत.
राज्यातील प्रमुख बाजारांमधील बाजारभाव
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 1500, कमाल 4400 आणि सरासरी 3200 असा भाव मिळाला आहे.
मुंबई कांदा बटाटा मार्केट : या बाजारात किमान 3300, कमाल 3900 आणि सरासरी 3600 असा भाव मिळाला आहे.
छत्रपती संभाजी नगर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान दोन हजार, कमाल 4000 आणि सरासरी 3000 असा भाव मिळाला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज लाल कांद्याला किमान 700, कमाल 4500 आणि सरासरी 3500 असा भाव मिळाला आहे.
सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान दोन हजार, कमाल 4000 आणि सरासरी 3000 असा दर मिळाला आहे.
अमरावती फळे आणि भाजीपाला मार्केट : या बाजारात आज कांद्याला किमान 3200, कमाल 4800 आणि सरासरी 4000 असा भाव मिळाला आहे.
साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती : येथे आज किमान 3105, कमाल 3765 आणि सरासरी 3700 असा भाव मिळाला आहे.
सांगली फळे भाजीपाला मार्केट : या बाजारात आज कांद्याला किमान दोन हजार, कमाल 4,200 आणि सरासरी 3100 असा भाव मिळाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : येथे आज किमान 2500, कमाल 4000 आणि सरासरी 3250 असा दर मिळाला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज पांढरा कांदा किमान 3500, कमाल 4500 आणि सरासरी 4250 या भावात विकला गेला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 700, कमाल 3851 आणि सरासरी 3600 रुपये भाव मिळाला आहे.
येवला अंदरसुल कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज कांद्याला किमान सतराशे, कमाल 3788 आणि सरासरी 3650 असा भाव मिळाला आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 2800, कमाल 3950 आणि सरासरी 3650 असा भाव मिळाला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात अजूनही कांद्याला किमान 1401, कमाल 3870 आणि सरासरी 3750 चा भाव मिळाला आहे.
मालेगाव मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 2500, कमाल 3877 आणि सरासरी 3650 असा दर मिळाला आहे.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान हजार, कमाल 4200 आणि सरासरी 3700 असावा मिळाला आहे.
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 2100, कमाल 4,375 आणि सरासरी 3800 असा भाव मिळाला आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 1000, कमाल 4000 आणि सरासरी 2500 असा भाव मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज उन्हाळी कांद्याला किमान 2000, कमाल 4171 आणि सरासरी 3851 असा भाव मिळाला आहे.