Onion Price : कांद्याच्या दरात आज मोठी तफावत पाहायला मिळाली आहे. काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला क्रमी दर मिळाला आहे तर काही एपीएमसीमध्ये कांदा अतिशय कवडीमोल दरात विक्री झाला आहे.
आज नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 6050 रुपये प्रति क्विंटल एवढा उच्चांकी दर नमूद करण्यात आला आहे. याबरोबरच पेन एपीएमसीमध्ये देखील कांदा चार हजार पार झाला आहे.
मात्र काही बाजारपेठेत कांदा कवडीमोल विकला गेला आहे. कांदा दरातील ही तफावत पाहता आज शेतकऱ्यांमध्ये कही खुश आहे तो कही गम असा माहोल बनला आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मिळालेल्या बाजारभावा विषयी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- कोल्हापूर एपीएमसीमध्ये आज 6257 क्विंटल कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला सातशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1600 रुपये नमूद झाला आहे.
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 1350 क्विंटल कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव साडेनऊशे रुपये नमूद झाला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज लाल कांद्याची 20444 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 3300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1250 नमूद झाला आहे.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 1701 क्विंटल लाल कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये लाल कांद्याला शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2550 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच दोन हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी बाजारभावाची नोंद झाली आहे.
पेन कृषी उत्पन्न बाजार समिती :- पेन एपीएमसी मध्ये आज 267 क्विंटल लाल कांदा आवक झाली. झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 3800 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून चार हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 3800 रुपये प्रति क्विंटल नमूद झाला आहे.
साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज चार हजार 450 क्विंटल लाल कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून १६८५ रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1100 रुपये नमूद झाला आहे.
सांगली फळे भाजीपाला मार्केट :- या एपीएमसी मध्ये आज 3605 क्विंटल लोकल कांदा आवक झाली. आजच झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला तीनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1250 नमूद झाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 570 क्विंटल पोळ कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 740 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 6050 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 2900 नमूद झाला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 6000 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1700 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1100 रुपये नमूद झाला आहे.
येवला अंदरसुल कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 2000 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 251 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1301रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 901 रुपये नमूद झाला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 7630 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला सहाशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1744 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1400 रुपये नमूद झाला आहे.
लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 9525 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1651 प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव १३५० नमूद झाला आहे.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 7541 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून दोन हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1200 रुपये नमूद झाला आहे.
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती :- कळवणी एपीएमसी मध्ये आज चार हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला दीडशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2055 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1200 रुपये नमूद झाला आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 7480 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला तीनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून दोन हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव तेराशे रुपये नमूद झाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 7280 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून २०९० रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1400 रुपये नमूद झाला आहे.