Onion Price : गेल्या काही दिवसांपासून कांदा बाजारभाव दबावात असल्याचे चित्र आहे. खरं पाहता कांद्याला सप्टेंबर महिन्यापर्यंत अतिशय कमी दर मिळत होता. मात्र ऑक्टोबर महिन्यापासून दरात थोडी वाढ होण्यास सुरुवात झाली.
नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात कांद्याला विक्रमी दर मिळाला. तदनंतर मात्र बाजारभावात मोठी घसरण झाली. आता बाजारात कांदा अतिशय कवडीमोल भावाने विकला जात आहे.
आजही राज्यातील जवळपास सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजार भाव दबावात पाहायला मिळाले. मात्र असे असले तरी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक होत असलेल्या पोळ कांद्याला आज सर्वोच्च दर मिळाला आहे.
आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये पोळ कांद्याला तब्बल 3505 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. निश्चितच यामुळे आगामी काही दिवसात कांदा दरात वाढ होईल असे शेतकऱ्यांना असे वाटू लागली आहे. मात्र राज्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला खूपच नगण्य दर मिळत आहे.
जाणकार लोकांच्या मते पिंपळगाव एपीएमसी मध्ये आवक होत असलेला कांदा अव्वल दर्जाचा असतो. यामुळे या कांद्याला बाजारात मोठी मागणी आहे. शिवाय बाजार भाव देखील चांगला मिळत आहे. जेव्हापासून पिंपळगाव एपीएमसी मध्ये पोळ कांद्याचे आवक सुरू झाली आहे तेव्हापासून पोळ कांद्याला विक्रमी दर मिळत आहे.
दरम्यान आज देखील पिंपळगाव एपीएमसी मध्ये या कांद्याला विक्रमी दर मिळाला आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की आज झालेल्या लिलावात पिंपळगाव एपीएमसीमध्ये या कांद्याची 1560 क्विंटल आवक झाली.
आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून तीन हजार 505 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 2500 रुपये नमूद झाला आहे.