Onion Price Maharashtra : कांदा याला कॅश क्रॉप अर्थातच नगदी पिकाचा दर्जा प्राप्त आहे. हे पीक शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचे दोतक आहे. या पिकावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. तसेच हे पीक राजकारणातही मोठी महत्वाची भूमिका निभावत असते.
कांद्यावर राजकारण देखील कायमच पाहायला मिळाले आहे. अशातच गेल्या काही महिन्यापासून कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत होता. यामुळे यावर राजकारण देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले.
कांद्याला अनुदान देऊन सत्तापक्षाने राजकारणातला मोठा डाव खेळला तर विरोधी पक्षाने कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल दरासाठी सत्ता पक्षाला कचाट्यात घेतलं आणि संधी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्यक्षात दरवाढीसाठी न सत्ता पक्षाकडून काही करण्यात आले, न विपक्षने यासाठी सरकारवर दबाव बनवणे हेतू काही विशेष रणनीती आखली.
त्यामुळे कांदा हे शेतकऱ्यांचे अर्थकारणासाठी महत्त्वपूर्ण असले तरीदेखील सर्वाधिक चर्चेत राहण्याचे कारण राजकारणच आहे असे या निमित्ताने सांगावेसे वाटते. शेतकऱ्यांना साधण्यासाठी कांदा या मुद्द्यावर कायमच राजकारण केले जाते. भविष्यात देखील होणारच आहे.
या राजकारणात मात्र कांदा उत्पादक कायमच भरडला जातो. दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे कांद्याच्या दरात आता वाढ झाली आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा दरात मोठी वाढ झाली असून 1350 प्रतिक्विंटल पर्यंतचा दर कांद्याला मिळाला आहे.
गेल्या पंधरवाड्याशी तुलना केली असता दहा टक्के वाढ नमूद करण्यात आली आहे. रविवारी मंचर एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात हा भाव मिळाला आहे. बाजार समितीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी मंचर एपीएमसी मध्ये 11000 पेशव्यांची आवक झाली.
यामध्ये एक नंबर गोळा कांदा 1200 ते 1350 रुपये प्रतिक्विंटल या भावाने विकला गेला आहे. तसेच सुपर कांदा 800 ते 1000 रुपये, गुलटी कांदा 400 ते 600 रुपये तर बदला कांदा 100 ते 300 रुपये अशा भावात विकला गेला आहे.
निश्चितच कांदा उत्पादकांसाठी ही एक दिलासादायक बातमी राहणार आहे. यानिमित्ताने भविष्यात कांदा दरात वाढ होऊ शकते असं चित्र देखील तयार होत आहे.