Onion Price : राज्यात कांद्याची एकूण तीन हंगामात शेती केली जाते. खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात आपल्याकडे कांदा उत्पादित केला जातो. देशाच्या एकूण कांदा उत्पादनात आपल्या राज्याचा मोठा वाटा आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात भारत देशाच्या एकूण कांदा उत्पादनापैकी 40% कांदा उत्पादित होतो.
अर्थातच राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण हे कांदा या नगदी पिकावर अवलंबून असल्याचे चित्र आहे. मात्र कांद्याच्या बाजारभावात कायमच चढउतार पाहायला मिळतो. अनेकदा कांदा अगदी रद्दीपेक्षा कमी भावात विकला जातो.
सध्या बाजारात तशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. सध्या बाजारात उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणात दाखल होत असून कांद्याला मात्र दोन ते तीन रुपयाचा दर मिळत आहे. निश्चितच काही ठिकाणी कांद्याला एक हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत आहे.
हे पण वाचा :- नोकरीने मारले पण काळ्या आईने तारले ! शेवगा शेतीतून तरुण शेतकऱ्याने केली लाखोंची कमाई, वाचा ही यशोगाथा
मात्र हा भाव मोजक्याच शेतकऱ्यांना मिळतोय. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांकडे कांदा साठवण्याची व्यवस्था आहे ते शेतकरी कांद्याची साठवणूक करत आहेत. दरम्यान, उन्हाळी कांदा दरात लवकरच वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.
केंद्र शासनाकडून लवकरच एक मोठा निर्णय घेतला जाणार असून या निर्णयामुळे उन्हाळी कांदा दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्र शासन लवकरच नाफेड च्या माध्यमातून कांदा खरेदी करणार आहे. त्यामुळे कांदा दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
वास्तविक, गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात उन्हाळी कांद्याची खरेदी सुरू झाली होती. यंदा मात्र एप्रिल महिना उलटून गेला आणि आता मे महिना देखील उलटत चालला आहे तरीही उन्हाळी कांद्याची खरेदी नाफेड कडून सुरू झालेली नाही. मात्र या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांनी एक मोठी अपडेट दिली आहे.
हे पण वाचा :- धक्कादायक ! ‘या’ एका चुकीमुळे महाराष्ट्रातील 32 लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही नमो शेतकरीचा पहिला हप्ता, वाचा सविस्तर
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी पत्रकारांना या संदर्भात माहिती दिली आहे. पवार यांच्या मते लवकरच नाफेड मार्फत उन्हाळी कांदा खरेदी होणार आहे.
एवढेच नाही तर यंदा तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट नाफेड करून ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. खरं पाहता यावर्षी लाल कांदा देखील नाफेडने खरेदी केला आहे. लाल कांदा अधिक काळ टिकत नाही यामुळे नाफेडच्या माध्यमातून याची खरेदी होत नाही.
पण यंदा लाल कांदा खरेदी करून कांदा उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. दरम्यान उन्हाळी कांदा खरेदी देखील लवकरच सुरू होणार आहे. यामुळे निश्चितच उन्हाळी कांद्याला चांगला दर आता मिळेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; यंदा कोणत्या नक्षत्रात पडणार अधिक पाऊस अन कोणत्या नक्षत्रात कमी, वाचा याविषयी सविस्तर