Onion Price : नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून कांदा दरात सातत्याने घसरल होत आहे. शेतकरी बांधवांनी सप्टेंबर महिन्यापर्यंत कांदा अतिशय कवडीमोल दरात विकला होता. सप्टेंबर महिन्यानंतर काहीशी परिस्थिती बदलली ऑक्टोबर महिन्यात कांद्याला समाधानकारक दर मिळू लागला.
ऑक्टोबर नंतर दरात अजून वाढ झाली नोव्हेंबर मध्ये विक्रमी दर कांद्याला प्राप्त झाला. मात्र, शेतकऱ्यांना थोडेफार चांगले दिवस आलेत की नियतीला ते मान्य नसतं. म्हणूनच की काय नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढ्या सरासरी दराने विक्री होणारा कांदा दुसऱ्या पंधरवड्यात 1500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री होऊ लागला.
आता तर हद्दच झाली आहे, कांदा गेल्या तीन ते चार दिवसांपासून एक हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा कमी सरासरी बाजारभावात बहुतांशी एपीएमसी मध्ये विक्री होत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत सांगा आता शेती करायची कशी असा प्रश्न बळीराजा उपस्थित करू लागला आहे.
निश्चितच शेतकऱ्यांमागची संकटाची मालिका काही संपण्याचे नाव घेत नाहीये. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख एपीएमसीमध्ये झालेल्या कांदा लिलावाची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. जेणेकरून शेतकरी बांधवांना बाजारपेठेत कांद्याला काय बाजारभाव मिळतो याविषयी कल्पना येईल.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज पाच हजार पाच क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला सातशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1200 रुपये नमूद झाला आहे.
मुंबई कांदा बटाटा मार्केट :- या एपीएमसी मध्ये आज 11382 क्विंटल एवढी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 900 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1800 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1350 नमूद झाला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज सोलापूर एपीएमसी मध्ये 33 हजार 317 क्विंटल लाल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला शंभर रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1200 रुपये नमूद झाला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 960 क्विंटल एवढी लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 1111 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून कमाल बाजार भाव 2200 रुपये नमूद झाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1840 रुपये नमूद झाला आहे.
मालेगाव मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 4500 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला नऊशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2125 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1700 रुपये नमूद झाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज दहा हजार चार क्विंटल एवढी लोकल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून पंधराशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1000 रुपये नमूद झाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज चार हजार 750 क्विंटल पोळ कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 3230 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 2300 नमूद झाला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज 5000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला तीनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून कमाल दर 1501 रुपये आणि सरासरी दर सातशे रुपये नमूद झाला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 5100 क्विंटल एवढी उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1252 प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 970 नमूद झाला आहे.
मालेगाव-मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज दहा हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. या एपीएमसीमध्ये कांद्याला दोनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 950 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. सरासरी बाजार भाव 700 रुपये नमूद झाला आहे.
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 14300 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला शंभर रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून पंधराशे रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल तसेच सरासरी बाजार भाव साडेआठशे रुपये नमूद झाला आहे.
सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 9310 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 175 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून कमाल दर 1195 तसेच सरासरी बाजार भाव सातशे रुपये नमूद झाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये पोळ कांदा विक्रमी दरात विक्री होत आहे मात्र उन्हाळी कांदा अतिशय कवडीमोल दरात. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये उन्हाळी कांद्याची 8625 क्विंटल आवक झाली. या कांद्याला सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1420 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1100 रुपये नमूद झाला आहे.
देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 6153 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला दीडशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1 हजार 5 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव आठशे रुपये नमूद झाला आहे.