Onion News : कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणारे एक मुख्य नगदी पीक. विशेष म्हणजे या पिकाच लागवडीखालील क्षेत्र आपल्या राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. कांद्याला कितीही कमी दर मिळत असला तरी देखील शेतकरी बांधव कांदा लागवडीचा मोह काही आवरु शकत नाही.
याचेच एक उत्तम उदाहरण यावर्षी समोर येत आहे. यंदा शेतकऱ्यांनी ऑक्टोबरचा संपूर्ण महिना आणि नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा सोडला तर संपूर्ण वर्ष अतिशय कमी दरात कांदा विक्री केला आहे. यंदा जी परिस्थिती कांदा उत्पादक शेतकऱ्यांपुढे उभी झाली आहे यापेक्षा वाईट काहीशी परिस्थिती 2018-19 मध्ये होती.
त्यावर्षी कांद्याला अतिशय नगण्य दर मिळाला यामुळे कांदा उत्पादकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली होती. अशा परिस्थिती त्यावेळी शासनाने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी अनुदान देण्याची घोषणा केली होती. प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याची घोषणा शासनाकडून झाली बहुतांशी शेतकऱ्यांना अनुदान मिळाले.
मात्र इतर योजनेप्रमाणे या योजनेतून देखील पात्र असूनही अनेक शेतकरी वंचित राहिले. सोलापूर जिल्ह्यातील कांदा उत्पादकांचा देखील यामध्ये समावेश होता. जिल्ह्यातील 1 हजार 172 शेतकरी बांधवांना कांदा अनुदान मिळालेले नाही. आता चार वर्षे होत आले तरी देखील यांना अनुदान मिळालं नव्हतं.
पण आता या शेतकरी बांधवांना दोन कोटी 14 लाखांचे अनुदान दिल जाणार आहे. मोहोळ, बार्शी, करमाळा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, माळशिरस या तालुक्यातील शेतकरी बांधवांचे अनुदान रखडले होते. या अशा पात्र शेतकऱ्यांची यादी बाजार समितीकडून शासनाला पाठवण्यात आली होती.
आता अनुदानाची रक्कम मंजूर झाली असून येत्या आठ ते दहा दिवसात पात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. हे अनुदान शेतकऱ्यांनी दिलेल्या बँक खात्यात सरळ वर्ग होणार आहे.