Onion Market : गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात रोजाना थोडी का होईना पण वाढ नमूद केली जात असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्टपणे झळकत होतं. मात्र आज पुन्हा एकदा कांदा दरात घसरण झाली असल्याने. कांदा दरातील लहरीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
खरं पाहता, शेतकरी बांधवांनी यावर्षी कांदा अतिशय कवडीमोल दरात विकला आहे. सप्टेंबर 2022 पर्यंत 700 ते 800 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत होता. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात दरात वाढ झाली. कांद्याला 2500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी दर मिळाला.
नोव्हेंबर महिन्यात कांदा दर विक्रमी पातळीवर पोहचला. नोव्हेंबर महिन्यातील सुरुवातीचे पंधरा दिवस कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा सरासरी दर मिळाला तर 3500 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव काही ठिकाणी नमूद करण्यात आला होता.
मात्र तदनंतर कांदा दरात घसरण झाली. परिस्थिती एवढी बिकट बनली की तीन हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जाणारा कांदा अक्षरशः एक हजार रुपये पेक्षा कमी दरात विकला जाऊ लागला. दरम्यान आता चार ते पाच दिवसांपासून यामध्ये काही सुधारणा झाली.
1500 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर कांद्याला मिळू लागला. उन्हाळी कांदा मात्र कमीच दरात विकला जात होता. परंतु नवीन लाल कांदा समाधानकारक दरात विकला जात होता, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता.
मात्र आता दरात पुन्हा एकदा घसरण झाली असून मुंबईच मार्केट वगळता जवळपास सर्वत्र कांदा बाजारभावात घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी साहजिकच वाढली आहे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावाची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 6140 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1200 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मुंबई कांदा बटाटा मार्केट :- आज या मार्केटमध्ये 15725 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1900 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 16000 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 250 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1626 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1300 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 12510 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1862 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1600 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 9500 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1621 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
येवला-आंदरसूल कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 6000 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1602 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1300 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव-निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 900 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 1231 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1626 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1525 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 11430 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2100 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 18500 क्विंटल पोळ कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1920 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1600 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 7300 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 150 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1630 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1050 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 861 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 600 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 1000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1365 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1100 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.