Onion Market Rate : सध्या देशात नवरात्र उत्सव सुरू आहे. पण उद्या नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे. उद्या अर्थातच 12 ऑक्टोबरला विजयादशमीचा म्हणजेच दसऱ्याचा मोठा पर्व साजरा केला जाणार आहे. दरम्यान विजयादशमीच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील काही बाजारांमध्ये कांद्याला चांगला विक्रमी दर मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज अर्थातच 11 ऑक्टोबरला राज्यातील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर एपीएमसी मध्ये आज कांद्याला किमान 500, कमाल 5200 आणि सरासरी 2 हजार असा भाव मिळाला आहे. दरम्यान आता राज्यातील इतर बाजारांमध्ये कांद्याला काय भाव मिळत आहे या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये कांद्याला काय दर मिळतोय?
अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट : या बाजारात कांद्याला किमान 4000 कमाल 5000 आणि सरासरी 4500 सादर मिळाला आहे.
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 500, कमाल 4750 आणि सरासरी 3800 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
दौंड केडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : मार्केटमध्ये कांद्याला किमान 800 कमाल 4600 आणि सरासरी 3600 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 877 कमाल 4627 आणि सरासरी 2750 असा भाव मिळाला आहे.
लासलगाव निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती : बाजारात कांद्याला कमाल 4700, किमान 2200 अन सरासरी 4500 असा भाव मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 2700 कमाल 4951 आणि सरासरी 4400 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला आहे.
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 1800 कमाल 4810 आणि सरासरी चार हजार पन्नास रुपये असा दर मिळाला आहे.