Onion Market Price : गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याच्या दरात (Onion Rate) सातत्याने घसरण बघायला मिळतं आहे. सध्या कांद्याला 1300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव (Onion Bajarbhav) मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी (Onion Grower Farmer) हतबल झाल्याचे चित्र आहे.
कांद्याला सध्या मिळत असलेल्या बाजार भावात कांद्यासाठी झालेला खर्च काढणे देखील मुश्किल असल्याचे शेतकरी (Farmer) नमूद करत आहेत. अशा परिस्थितीत सांगा शेती (Farming) करायची कशी असा सवाल शेतकरी बांधव उपस्थित करीत आहेत.
दरम्यान राज्यातील अनेक शेतकरी संघटनांनी कांदा दरात वाढ करणेबाबत सरकारकडे मागणी केली आहे. याशिवाय अनेक शेतकरी संघटनांनी कांद्याचे (Onion Crop) धोरण सुधारित करावे अशी मागणी केली आहे. दरम्यान आज देखील कांद्याचे बाजारभाव तेराशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंतचं बघायला मिळाले.
देवळा एपीएमसीमध्ये तर कांद्याला 75 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव आज नमूद करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकरी बांधव कांद्याला कमीत कमी तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव मिळावा अशी मागणी करत आहेत.
मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच कांद्याचे बाजार भाव जाणून घेत असतो. आज देखील आपण कांद्याचे बाजार भाव जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याला काय बाजार भाव मिळाला.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 2826 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच एक हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला.
मुंबई कांदा बटाटा मार्केट :- या बाजारात आज अकरा हजार 214 क्विंटल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच 1200 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला.
सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 78 क्विंटल कांद्याची आवक झाली. एपीएमसीमध्ये कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच 1250 रुपये प्रतिक्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला आहे.
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती :- एपीएमसीमध्ये आज 79 क्विंटल कांद्याची आवक झाली. एपीएमसीमध्ये आज कांद्याला 200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच 1150 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव कांद्याला मिळाला आहे.
कराड कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसीमध्ये आज 99 क्विंटल हलवा कांद्याची आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून तेराशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. साधारण बाजार भाव देखील तेराशे रुपये प्रतिक्विंटल एवढाच राहिला.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 7788 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2100 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव आठशे रुपये नमूद करण्यात आला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नागपूर एपीएमसीमध्ये आज 1800 क्विंटल एवढी लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. 1375 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज नमूद करण्यात आला.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज पुणे एपीएमसी मध्ये 7219 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये कांद्याला सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच एक हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- बाजारात आज एक हजार क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक झाली. या एपीएमसीमध्ये आज एक हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव कांद्याला मिळाला असून 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव कांद्याला मिळाला आहे. तसेच एक हजार 375 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये कांद्याला मिळाला.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज सात हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात कांद्याला 150 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1470 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. 850 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज येवला एपीएमसी मध्ये नमूद करण्यात आला.
येवला अंदरसुल कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज पाच हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. या एपीएमसीमध्ये उन्हाळी कांद्याला 150 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1191 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच 825 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज उन्हाळी कांद्याला या एपीएमसीमध्ये मिळाला.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये कांद्याची सहा हजार क्विंटल आवक झाली. या एपीएमसीमध्ये कांद्याला चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1 हजार 490 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये उन्हाळी कांद्याला मिळाला.
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजारात आज उन्हाळी कांद्याची आठ हजार 200 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून एक हजार 605 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव नमूद करण्यात आला आहे. तसेच 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आजचे एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला आहे.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- पारनेर एपीएमसीमध्ये 2353 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. कांद्याला तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव आजच्या लिलावात या एपीएमसीमध्ये मिळाला असून 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव कांद्याला मिळाला आहे. तसेच 750 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला आहे.
देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये 6830 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. कांद्याला 75 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव या एपीएमसी मध्ये मिळाला असून 1250 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव कांद्याला या एपीएमसीमध्ये मिळाला आहे. तसेच एक हजार 125 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये कांद्याला नमूद करण्यात आला आहे.