Onion Market Price : मित्रांनो महाराष्ट्रात कांद्याची शेती (Onion Farming) मोठ्या प्रमाणात केली जाते. कांदा पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे (Farmer) अर्थकारण अवलंबून असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या बाजार भावात (Onion Rate) सातत्याने घसरण बघायला मिळत आहे.
यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना (Onion Grower Farmer) याचा मोठा फटका बसत आहे. ज्यात वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी मला दरात सुधारणा व्हावी या अनुषंगाने सरकारकडे पाठपुरावा देखील केला आहे. मात्र असे असले तरी कांद्याच्या दरात सुधारणा होतं नसल्याचे चित्र आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी रोजच कांद्याचे बाजारभावाची माहिती घेऊन हजर होत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मिळालेल्या बाजार भावाविषयी (Onion Bajarbhav) विस्तृत चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : कोल्हापूर एपीएमसीमध्ये आज चार हजार 369 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात कोल्हापूर एपीएमसीमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटलचा किमान बाजार भाव मिळाला असून 1700 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे तसेच आज झालेल्या लिलावात कोल्हापूर एपीएमसीमध्ये कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.
मुंबई कांदा बटाटा मार्केट:- या एपीएमसीमध्ये आज नऊ हजार 185 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याला 900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून सोळाशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज झालेल्या लिलावात मुंबई कांदा बटाटा मार्केट मार्केट यार्डात कांद्याला 1250 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला.
खेड-चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजार समितीत आज 225 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या बाजार समितीत कांद्याला 800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये बाराशे रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव कांद्याला मिळाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- पुणे एपीएमसी मध्ये आज दहा हजार 226 क्विंटल एवढी लोकल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात पुणे एपीएमसीमध्ये कांद्याला 600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पंधराशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच 1050 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज पुणे एपीएमसी मध्ये नमूद करण्यात आला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती :- येवला एपीएमसीमध्ये आज सात हजार क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात येवला एपीएमसीमध्ये कांद्याला दीडशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1338 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे तसेच 850 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- लासलगाव एपीएमसी मध्ये आज आठ हजार 250 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात लासलगाव एपीएमसीमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1426 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच 1151 रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती :- कळवण एपीएमसीमध्ये आज सात हजार 500 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात कळवण एपीएमसीमध्ये अडीचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव कांद्याचा मिळाला असून 1550 रुपये प्रति क्विंटल असा कमाल बाजार भाव कांद्याला मिळाला आहे. तसेच एक हजार अकरा रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये कांद्याला मिळाला.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज कांद्याची 20 हजार 500 क्विंटल आवक झाली. झालेल्या लिलावात पिंपळगाव बसवंत याठिकाणी कांद्याला 300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1605 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच 1225 रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.
देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती : देवळा एपीएमसीमध्ये आज सर्वात कमी किमान बाजार भाव मिळाला आहे. देवळा एपीएमसीमध्ये आज सात हजार 550 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेला लिलावात देवळा एपीएमसीमध्ये कांद्याला शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.