Onion Market Price : कांदा उत्पादक शेतकरी बांधव गेल्या काही दिवसांपासून संकटात सापडला आहे. खरं पाहता, कांद्याचे दर जवळपास अडीच महिन्यांपासून निच्चाकी पातळीवर असल्याने शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. सद्यस्थितीला कांद्याचा सरासरी बाजार भाव हा 1500 रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी आहे.
अशा परिस्थितीत कांदा पिकासाठी झालेला खर्च कसा वसूल करायचा हाच मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढ्यात उभा राहिला आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2022 दरम्यान कांदा विक्रमी दरात विक्री झाला होता. त्यावेळी कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी दर नमूद केला जात होता.
मात्र तदनंतर विशेषतः नोव्हेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात दरात मोठी पडझड झाली. कांद्याला मात्र 700 ते आठशे रुपये प्रति क्विंटल सरासरी दर काही बाजारात नमूद झाला. त्यानंतर नवीन वर्षात थोडीशी रिकव्हरी झाली. कांदा दराने 1500 रुपये प्रति क्विंटलचा सरासरीचा टप्पा ओलांडला. अनेक बाजारात 2500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल बाजार भाव पोहोचला.
मात्र आता गेल्या काही दिवसांपासून एक हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास सरासरी दर काही बाजारात नमूद केला जात असून काही बाजारात 1,500 रुपये प्रतिक्विंटलच्या आसपासचा दर पाहायला मिळत आहे. एकंदरीत 1000 ते 1500 दरम्यान बाजारभाव असल्याने कांदा उत्पादक मेटाकुटीला आला आहे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख बाजारात कांद्याला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा सविस्तर प्रयत्न करणार आहोत.
सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 288 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 265 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1300 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 17278 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1250 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
पुणे- खडकी कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 10 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1250 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
पुणे- मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 287 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 900 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.