Onion Market Price: मित्रांनो राज्यात कांद्याचे (Onion Crop) क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. राज्याच्या पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन (Onion Production) घेतले जाते. खरं पाहता राज्यात थोड्या बहुत प्रमाणात सर्वत्र कांद्याचे उत्पादन बघायला मिळते.
अशा परिस्थितीत राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण कांदा या नगदी पिकावर (Cash Crop) अवलंबून असते. यामुळे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे (Farmer) कांद्याच्या बाजारभावाकडे (Onion Rate) नेहमीच लक्ष लागून असते.
अशा परिस्थितीत आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी कांद्याचे ताजे बाजार भाव देऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समिती (Apmc) मधील कांद्याचे बाजार भाव जाणून घेऊया.
18 ऑगस्ट 2022 रोजी राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याचे बाजार भाव
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2584 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज या बाजार समितीत कांद्याला जास्तीत जास्त 1800 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला तसेच कमीत कमी बाजार भाव 700 रुपये प्रति क्विंटल एवढा राहिला. आज या बाजारसमितीत सर्वसाधारण बाजार भाव 1200 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची 9 हजार क्विंटल आवक झाली. आज लासलगाव एपीएमसी मध्ये कांद्याला 1490 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल भाव मिळाला, तसेच किमान भाव 500 रुपये प्रति क्विंटल एवढा होता. आज सर्वसाधारण बाजार भाव या एपीएमसीमध्ये 1250 रुपये एवढा राहिला.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी कांद्याची दहा हजार क्विंटल आवक झाली. या बाजार समितीत जास्तीत जास्त 1401 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला तर कमीत कमी 200 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव होता. सर्वसाधारण बाजार भाव 1100 रुपये प्रति क्विंटल एवढा राहिला.
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती:- आज कळवण एपीएमसी मध्ये 18200 क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली. या बाजार समितीत आज 1700 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त बाजार भाव नमूद करण्यात आला. या बाजार समितीत कमीत कमी बाजार भाव दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा राहिला. सर्वसाधारण बाजार भाव 1100 रुपये प्रति क्विंटल एवढा आज नमूद करण्यात आला.
देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती:- देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 9040 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज या बाजार समितीमध्ये 1320 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त बाजार भाव मिळाला असून कमीत कमी बाजार भाव 100 रुपये प्रति क्विंटल एवढा होता. सर्वसाधारण बाजार भाव 1200 रुपये प्रति क्विंटल एवढा राहिला.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती:- या बाजारात आज 8440 क्विंटल कांद्याची आवक झाली. या ठिकाणी 1600 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त बाजार भाव मिळाला तर कमीत कमी बाजार भाव 700 रुपये प्रति क्विंटल एवढा होता आणि सर्वसाधारण बाजार भाव 1100 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला.