Onion Market News : नाशिक जिल्ह्यात जवळपास 13 ते 14 दिवस बाजार समित्यामध्ये कांद्याचे लिलाव बंद करण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या कांदा लिलावासाठी पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत.
सध्या जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. पण आज जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याच्या उमराणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पावसाळी कांद्याची आवक झाली आहे.
खरंतर, नासिक हे कांद्याचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे. नासिक जिल्ह्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यात खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात कांद्याचे उत्पादन घेतले जाते.
खरीप अर्थातच पावसाळी हंगामातील लाल कांदा मात्र दरवर्षी दसऱ्यानंतर बाजार समितीमध्ये येतो. यावर्षी मात्र दसऱ्याच्या तीन आठवड्यापूर्वीच जिल्ह्यातील उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पावसाळी कांदा दाखल झाला आहे.
अशा परिस्थितीत आज आपण उमराणे येथे दाखल झालेल्या पावसाळी कांद्याला काय भाव मिळालाय तसेच उन्हाळी कांद्याला जिल्ह्यात काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
पावसाळी कांद्याला काय भाव मिळाला ?
लोकमत वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव तालुक्यातील निंबायती येथील शेतकरी गणेश साहेबराव गुमनर यांनी दसऱ्याच्या तीन आठवड्यापूर्वीच पावसाळी कांदा उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीस आणला होता.
या कांद्याला येथील गजानन आडतचे संचालक कांदा व्यापारी संजय देवरे यांनी खरेदी केला आहे. या कांद्याला २४१५ रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला आहे.
जिल्ह्यातील इतर बाजारात कांद्याला काय भाव मिळाला
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज 7000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली होती. या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान 600, कमाल 2390 आणि सरासरी 1900 एवढा भाव मिळाला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज 8400 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 1000, कमाल 2700 आणि सरासरी 2200 एवढा भाव मिळाला आहे.
लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती : लासलगाव एपीएमसी अंतर्गत येणाऱ्या विंचूर या उपबाजारात आज 5000 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. या मार्केटमध्ये आज कांद्याला किमान एक हजार 200, कमाल 2542 आणि सरासरी 2250 रुपये एवढा भाव मिळाला आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये 5000 क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान 500, कमाल 2525 आणि सरासरी दोन हजाराचा भाव मिळाला