Onion Market Maharashtra : गेली कित्येक दिवस दबावत असलेला कांदा बाजार जुलै महिन्यात तेजीत आला आहे. तेव्हापासून बाजारातील ही तेजी कायमच आहे. मध्यंतरी कांद्याचे भाव रिवर्स झाले होते मात्र आता कांदा बाजार गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर आहे. सध्या राज्यातील महत्त्वाच्या बाजारात कांद्याला एक हजार रुपये प्रति क्विंटल ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी भाव मिळत आहे.
तर कमाल बाजारभावाने राज्यातील अनेक बाजारात 2500 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठला आहे. अनेक बाजारात कांद्याचे दर तीन हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते. मात्र हा भाव जास्त काळ टिकला नाही. आता राज्यातील काही बाजारात 2500 रुपये प्रति क्विंटल ते 2700 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे.
पण राज्यातील काही मोजक्याच बाजार समितीमध्ये हा विक्रमी भाव मिळत आहे. पण गेली कित्येक महिने अगदी कवडीमोल दरात कांदा विकावा लागला असल्याने सध्या बाजारात आलेली ही तेजी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देत आहे. आज देखील राज्यातील अनेक महत्त्वाच्या बाजारात कांद्याला चांगला समाधानकारक भाव मिळाला आहे.
आज राज्यातील चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वोच्च भाव मिळाला आहे. या एपीएमसी मध्ये आज कांद्याला तब्बल 2700 रुपये प्रति क्विंटलचा विक्रमी भाव मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर गंजवड एपीएमसी मध्ये आज 180 क्विंटल कांद्याची आवक झाली. या मार्केटमध्ये आजच्या लिलावात कांद्याला 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 2700 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि 1800 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव नमूद करण्यात आला आहे.
या बाजारात पण मिळाला विक्रमी भाव
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज 16,675 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली होती. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला किमान पाचशे रुपये, कमाल 2351 रुपये आणि सरासरी 1750 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव नमूद करण्यात आला.
वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज 2877 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आजच्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 2100 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि 1380 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव नमूद करण्यात आला आहे.