Onion Market : सध्या राज्यात कांद्याची चर्चा शेतकऱ्यांच्या बांधापासून ते अधिवेशनाच्या फ्लोर पर्यंत सर्वत्र पाहायला मिळत आहे. कांद्याची गुंज अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजली आहे. कांद्याच्या मुद्द्यावरून शिंदे फडणवीस सरकार बॅकफूटवर आले आहे. कांदा मात्र चार ते पाच रुपये प्रति किलो एवढ्या कमी दरात विक्री होत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. परिणामी शासनाकडून कांदा उत्पादकांना दिलासा देखील दिला गेला आहे.
शिंदे फडणवीस सरकारने कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल 350 रुपये इतक अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शासनाने जारी केलेलं हे अनुदान खूपच तोकडे असून शासन शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे की जखमेवर मीठ चोळण्याचा हा देखील मोठा प्रश्न या निमित्ताने शेतकऱ्यांकडून उपस्थित झाला आहे. अशातच आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासा देणारी बातमी तज्ञ लोकांच्या माध्यमातून समोर येत आहे.
तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बाजारात कांदा अतिशय कमी दरात विक्री होत आहे. याचे प्रमुख कारण आहे उत्तरेकडील राज्यात कांद्याचे झालेले अधिक उत्पादन. त्या ठिकाणी कांद्याचे अधिक उत्पादन झाले असल्याने तेथून कांद्याला मागणी खूपच कमी आहे. आपल्या राज्यातून सर्वाधिक उत्तरेकडे कांदा विक्री होतो. परिणामी तेथून मागणी कमी असल्याने याचा सरळ फटका राज्यातील कांदा उत्पादकांना बसला आहे.
मात्र उत्तरेकडील राज्यात उन्हाळी कांदा साठवणुकीसाठी अपेक्षित अशी साधने उपलब्ध नाहीत. उन्हाळी कांदा साठवण्यासाठी उत्तरेकडील राज्यांमध्ये आपल्या राज्याच्या तुलनेत कांदा चाळीसारख्या सुविधा खूपच कमी आहेत. यामुळे आता पावसाळी कांदा जरी शेतकऱ्यांचा कमी दरात विक्री होत असला तरी देखील आगामी काळात उन्हाळी कांदा साठवल्यानंतर शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचा अंदाज काही तज्ञ वर्तवत आहेत.
याशिवाय निर्यातीसाठी पोषक परिस्थिती देखील तयार होणार आहे. आपल्या देशातून सर्वाधिक कांदा बांगलादेश श्रीलंका यांसारख्या शेजारील देशात निर्यात होतो. गेल्या वर्षी मात्र या देशात आर्थिक आणीबाणी सारखी परिस्थिती तयार झाली होती. तेथील आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्यामुळे कांदा निर्यात मंदावली. याचा फटका म्हणून कांदा भावात घसरण झाली. परंतु आता तेथील परिस्थिती यावर्षी सुधारत आहे. म्हणजेच आता निर्यात आपल्या देशातून वाढणार आहे.
वास्तविक भारतीय कांद्याला असलेली अप्रतिम चव पाहता इतर कांदा पुरवठादार देशांच्या तुलनेत भारतीय कांद्याला कायमच अधिक मागणी राहते. त्यामुळे यंदाही भारतीय कांद्याला चांगली मागणी राहील आणि चांगला उठाव मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. या संपूर्ण गोष्टींचा विचार केला असता देशांतर्गत तसेच शेजारील देशात भारतीय कांद्याला मागणी वाढणार आहे.
हे पण वाचा :- महिलांना नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांची मेगा भरती सुरू, अर्ज करण्याची पद्धत पहा
साधारणता ऑगस्ट महिन्यानंतर कांद्याची मागणी वाढेल आणि तेव्हा दरातही वाढ होईल असा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत. यावर्षी एक तर उशिरा कांदा लागवड झाली आहे. शिवाय कांदा बियाण्याला विशेष मागणी नव्हती म्हणजेच कांदा लागवड कुठे ना कुठे कमी आहे. साठवणूकक्षम व टिकाऊ कांद्याचे अर्थातच उन्हाळी कांद्याचे प्रमाण कमी आहे. शिवाय नुकताच पडलेला अवकाळी पाऊस कांदा पिकासाठी मारक ठरला आहे. अशातच आता येणारा मान्सून हा एलनिनो मुळे प्रभावित होणार आहे.
म्हणजेच कमी पाऊस पावसाळी काळात राहणार आहे. या सर्व पार्श्वभूमीचा विचार करून कांदा मागणी अन दरात वाढ होऊ शकते असा त्यांनी अंदाज बांधला आहे. परंतु मागणी व पुरवठा यानुसार दरात चढ-उतार होणे हे बाजाराचं समीकरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याही गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्र कर्नाटक आणि मध्य प्रदेश या तीन राज्यात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन होते. रब्बी हंगामात मध्य प्रदेश मध्ये गव्हाची शेती वाढली आहे तशी आकडेवारी देखील समोर आली आहे.
अशा परिस्थितीत तृप्ती हंगामात गव्हाची लागवड वाढली म्हणजे कांद्याची लागवड त्या ठिकाणी कमी झाली आहे. याचाच अर्थ यंदा उत्पादनात घट होईलच. पण आता कांद्याचे भाव खरच वाढणार का? हा तर येणारा काळच सांगणार आहे. दरम्यान शेतकरी बांधवांनी बाजाराचा आढावा घेऊनच उन्हाळी कांदा साठवणुकीचं नियोजन केलं पाहिजे असं काही तज्ञ नमूद करत आहेत.
हे पण वाचा :- म्हाडाने घर सोडतीच्या अनामत रकमेसंदर्भात घेतला ‘हा’ मोठा निर्णय, घेतलेला निर्णय फायद्याचा की तोट्याचा? पहा….