Onion Market : कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी यंदाच वर्षे धोक्याचे सिद्ध झाले आहे. खरं पाहता, सप्टेंबर महिन्यापर्यंत कांदा अतिशय नगण्य दरात विकला जात होता. नंतर मात्र यामध्ये वाढ झाली. नोव्हेंबर महिन्यातील पंधरा तारखेपर्यंत कांदा दर तेजीत होते, पहिल्या आठवड्यात कांद्याला 3500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल दर मिळत होता.
सरासरी दर देखील 3000 रुपये प्रति क्विंटल असा मिळत होता. मात्र तदनंतर कांदा दरात घसरण झाली. चालू महिन्यात कांद्याला मात्र एक हजार रुपये प्रतिक्विंटल च्या आसपास सरासरी दर मिळत आहे. काल लाल कांदा दरात सुधारणा झाली होती. मात्र आज पुन्हा एकदा लाल कांदा दरात घसरण झाली.
आजच्या लिलावावर नजर टाकली असता उन्हाळी तसेच लाल कांदा दबावातच पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी बांधवांची दरवाढीची आशा आज देखील फोल ठरली आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख एपीएमसीमध्ये झालेल्या कांदा लिलावाची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 5961 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1200 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 4680 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 100 रुपये प्प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1650 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1100 रुपये प्रतिक्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 3150 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लीलावती या मार्केटमध्ये कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2051 प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1650 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 2000 क्विंटल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1951 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
सांगली फळे भाजीपाला मार्केट :- आज या मार्केटमध्ये 2912 क्विंटल लोकल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1150 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 8760 क्विंटल पोळ कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2455 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1650 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 3000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 200 प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1270 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी 700 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव -विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 3200 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1301 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी 1051 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 2860 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 350 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1380 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1100 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
येवला अंदरसुल कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 1500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 960 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 750 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.