Onion Farming: कांदा (Onion Crop) हे भारतात लावले जाणारे एक प्रमुख पीक आहे. मित्रांनो कांद्याची शेती (Onion Farming) एकूण तीन हंगामात केली जाते. खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तीन हंगामात कांद्याची शेती केली जाते. आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधव (Farmer) देखील या तीनही हंगामात कांद्याची लागवड (Cultivation Of Onion) करत असतात.
येत्या काही दिवसात शेतकरी बांधव खरीप हंगामातील (Kharif Season) लाल कांद्याची शेती (Red onion farming) सुरू करणार आहे. खरं पाहता या साठी रोपवाटिकेची (Onion nursery) तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. अनेक शेतकरी बांधवांनी रोपवाटिकेत कांद्याचे बियाणे (Onion seed) पेरले देखील आहे. अशा परिस्थितीत आगामी काही दिवसात खरीप हंगामातील लाल कांदा लागवडीस सुरुवात होणार आहे.
यामुळे आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी कांद्याच्या शेतीतील काही महत्त्वाच्या बाबी घेऊन हजर झालो आहोत. मित्रांनो खरं पाहता आज आपण कांदा पिकातील पीक व्यवस्थापन (Onion Crop Management) कशा पद्धतीने केले पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत. आज आपण कांदा पिकासाठी घातक ठरत असलेल्या दोन रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन (Onion Crop Pest Control) कशा पद्धतीने केले जाईल याविषयी समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
आज आपण करपा आणि जांभळा करपा या दोन रोगांचे (onion disease) एकात्मिक व्यवस्थापन किंवा नियंत्रण कशा पद्धतीने केली जाऊ शकते याविषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो हे दोन्ही रोग कांदा पिकासाठी अतिशय घातक असून यामुळे उत्पादनात मोठी घट होते. अशा परिस्थितीत या रोगांवर शेतकरी बांधवांनी नियंत्रण मिळवणे अतिशय आवश्यक असते.
कांदा पिकासाठी घातक ठरत असलेला ॲन्थ्रॅकनोज किंवा करपा रोग माहिती:-
जाणकार लोकांच्या मते, करपा रोगाच्या सुरुवातीला पातीवर पांढऱ्या रंगाचे ठिपके पडतात. यानंतर हे ठिपके पिवळ्या डागांमध्ये रूपांतरित होऊन संपूर्ण पातीवर पसरतात.
असे सांगितले जाते की, अति तीव्रतेमध्ये रोपाची मान लांबते. रोपांच्या माना मुरगळल्याप्रमाणे दिसतात. यामुळे कांदा पिकावर विपरीत परिणाम होतो. उत्पादनावर देखील विपरीत परिणाम होतो तसेच कांदा पोसण्यास देखील यामुळे अडचण येते. यामुळे या कांदा पिकासाठी घातक ठरत असलेल्या रोगावर वेळीच नियंत्रण मिळवावे लागते.
कांदा पिकासाठी घातक ठरत असलेला जांभळा करपा रोग माहिती:-
जाणकार लोकांच्या मते या रोगाच्या सुरुवातीला पानांवर पांढरट लांब चट्टे दिसतात. चट्ट्यांचा आतील भाग जांभळा दिसतो आणि नंतर काळा पडतो. शेवटी कांद्याची पात करपते. यामुळे कांदा पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. यामुळे संपूर्ण कांदा पीक धोक्यात येते. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना या रोगामुळे हजारो रुपयांचे नुकसान सहन करावे लागते. यामुळे या रोगावर देखील वेळीच नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे.
करपा तसेच जांभळा करपा रोग एकात्मिक व्यवस्थापन किंवा नियंत्रण कस करावं बर…!
जाणकार लोकांच्या मते, कांदा पिकासाठी कृषी विद्यापीठाने तसेच कृषी तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या मात्रेत नत्रयुक्त खतांचा डोस दिला पाहिजे.
रासायनिक पद्धतीने एकात्मिक व्यवस्थापन
कार्बेन्डाझिम (12 टक्के + मॅन्कोझेब (63 टक्के) 2.5ग्रॅम (संयुक्त बुरशीनाशक) एका लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा प्रोपीकोनॅझोल (25 ई.सी.) 1 मिलि एका लिटर पाण्यात घेउन फवारणी करावी किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी अधिक सुडोमोनास फ्लुरोसन्स 10 ग्रॅम एका लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी.
मित्रांनो येथे लक्षात ठेवा की, फवारणीवेळी प्रतिलिटर पाण्यात स्टिकर 0.5 मिलि मिसळावे लागणार आहे. जाणकार लोकांच्या मते स्टिकर औषधात टाकल्यामुळे फवारणी चांगली बसते. यामुळे फवारणीचा रिजल्ट चांगला मिळतो.