Onion Farming: कांदा (Onion Crop) हे एक नगदी पीक (Cash Crop) असून या पिकाची संपूर्ण भारत वर्षात कमी अधिक प्रमाणात शेती (Agriculture) बघायला मिळते. आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधव (Farmer) देखील मोठ्या प्रमाणात कांदा या पिकाची शेती करत असतात.
विशेष म्हणजे राज्यातील शेतकरी बांधव तीनही हंगामात कांद्याची शेती गेल्या अनेक दशकांपासून करत आहेत. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तसेच कोकणातील काही जिल्हे कांद्याच्या लागवडीसाठी ओळखले जातात. राज्यातील पश्चिम भाग हा कांद्याच्या लागवडीसाठी विशेष ओळखला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते.
नाशिक जिल्ह्याला कांद्याचे आगार म्हणून देखील संबोधत असतात. एवढेच नाही तर नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ देखील तयार करण्यात आली आहे. मित्रांनो सध्या शेतकरी बांधव कांदा पिकाची नर्सरी (onion nursery) तयार करण्यात व्यस्त आहेत. तर काही ठिकाणी कांदा पिकाच्या नर्सरीत पीक व्यवस्थापन (Onion Crop Management) केले जात आहे.
आगामी काही दिवसात राज्यातील बहुतांशी भागात खरीप हंगामातील लाल कांद्याची लावण सुरू केली जाणार आहे. अशा परिस्थितीत आम्ही आमच्या शेतकरी वाचक मित्रांसाठी कांदा पीक व्यवस्थापनातील काही महत्त्वाच्या बाबी घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आपण कांदा पीक लागवड केल्यानंतर 30 दिवसांनी कोणते खत दिले तर कांदा पिका चा चांगला विकास होईल याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कांदा पीक 30 दिवसांचे झाल्यानंतर कोण कोणती खते दिली पाहिजे.
मित्रांनो जाणकार लोकांच्या मते, कांदा पीक 30 दिवसांचे झाल्यानंतर 10:26:26 हे खत 60 किलो, तसेच मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो एकत्र करून जमिनीतून दिले पाहिजे. यामुळे कांदा पिकाची चांगली वाढ होत असल्याचा दावा केला जातो. कांदा पीक 30 दिवसांचे झाल्यानंतर या खताचा वापर केल्यामुळे स्फुरद या महत्त्वाच्या अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते, तसेच कांदा पिकाच्या मुळांचा विकास होऊन अन्नद्रव्यांचे पोषण क्षमता सुधारत असल्याचे जाणकार लोक नमूद करत असतात.
मित्रांनो जाणकार लोक माहिती देताना सांगतात की, कांदा पिकाच्या वाढीच्या अवस्थेत या खताच्या वापरामुळे सारख्या आकाराचे कांद्याचे उत्पादन मिळण्यास मदत होते व उत्पादनात 12 टक्क्यांपर्यंत वाढ होते. निश्चितच 30 दिवसानंतर या खतांचा वापर केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळणार आहे.
मित्रांनो येथे दिलेली माहिती ही कोणत्याही परिस्थितीत अंतिम राहणार नाही. कोणत्याही पिकावर कोणत्याही औषधांचा तसेच खतांचा वापर करण्यापूर्वी शेतकरी बांधवांनी एकदा कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे अपरिहार्य राहणार आहे.