Onion Farming : राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात कांदा लागवड (Cultivation Of Onion) करत असतात. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव खरीप, रब्बी तसेच उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करतात.
या खरीप हंगामात (Kharif Season) देखील शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात कांदा पिकाची (Onion Crop) शेती सुरू केले आहे. खरं पाहता कांदा हे एक नगदी पीक आहे. त्यामुळे कांदा पिकाची आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आणि राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे सर्व अर्थकारण कांदा या नगदी पिकावर (Cash Crops) अवलंबून असते.
मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांनी नुकतेच कांदा लागवड सुरू केली असून काही ठिकाणी कांदा लागवड पूर्ण झाली आहे. अशा परिस्थितीत आगामी काही दिवस कांदा पिकासाठी अति महत्त्वाचे राहणार आहे. मित्रांनो खरीप हंगामातील लाल कांदा पिकात वेगवेगळ्या रोगांचे सावट कायम असते.
मात्र जर रोगांवर वेळीच नियंत्रण (Onion Crop Management) मिळवले गेले तर शेतकरी बांधव होणारे नुकसान कमी करू शकतात. मित्रांनो खरीप हंगामातील कांदा पिकावर मर रोग (Damp Off) किंवा कूज रोग मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. अशा परिस्थितीत आज आपण मर रोगावर कशा पद्धतीने नियंत्रण (Onion Pest Management) मिळवले जाऊ शकते याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मररोग
कांद्यावरील ओल्या कुज रोगामुळे पाने पिवळी पडण्याची समस्या रोपवाटिकेच्या अवस्थेत दिसून येते. या रोगात, रोगकारक प्रथम झाडाच्या कॉलर भागावर हल्ला करतो. कालांतराने कॉलरचा भाग कोमेजतो आणि झाडे कोमेजतात आणि मरतात. या रोगाच्या प्रतिबंधासाठी निरोगी बियाणे पेरणीच्या वेळी निवडावे.
कूज रोग नियंत्रण उपाय
कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्ल्यूपी @ 30 ग्रॅम/15 लिटर किंवा थायोफेनेट मिथाइल 70% डब्ल्यूपी @ 50 ग्रॅम/15 लिटर किंवा मॅन्कोझेब 64% + मेटालॅक्सिल 8% डब्ल्यूपी @ 60 ग्रॅम/पंप (15 लिटर) दराने फवारणी करा
मित्रांनो येथे दिलेली माहिती ही कोणत्याही परिस्थितीत अंतिम राहणार नाही. कोणत्याही पिकावर कोणत्याही औषधाची फवारणी करण्या अगोदर तज्ञ लोकांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे अपरिहार्य राहणार आहे.